तुकाराम महाराज पालखीच्या दिंडीत गॅसचा भडका उडाल्याने जळाले तंबू

By admin | Published: June 23, 2017 08:12 PM2017-06-23T20:12:38+5:302017-06-23T20:51:58+5:30

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उंडवडी (ता. बारामती) येथील मुक्कामात स्वयंपाक बनवत असताना लागलेल्या आगीत ६ तंबू जळून खाक

Tukaram burnt due to gas flutter in Tukaram Maharaj | तुकाराम महाराज पालखीच्या दिंडीत गॅसचा भडका उडाल्याने जळाले तंबू

तुकाराम महाराज पालखीच्या दिंडीत गॅसचा भडका उडाल्याने जळाले तंबू

Next
ऑनलाइन लोकमत
बारामती(पुणे),दि.23 - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उंडवडी (ता. बारामती) येथील मुक्कामात स्वयंपाक बनवत असताना लागलेल्या आगीत ६ तंबू जळून खाक झाले. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी वेळीच आग आटोक्यात आणली. आज सायंकाळी पालखी मुक्कामाला येण्यापूर्वी पुढे आलेल्या भैरवनाथ प्रासादिक दिंडीच्या तंबूला आग लागली. आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला. आसपास जवळपास दीडशे तंबू टाकण्यात आलेले आहे. 
 
दौंड तालुक्यातून रोटी घाट मार्गे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज बारामती तालुक्यात आगमन झाले. दौंड आणि बारामतीच्या सिमेवर गुंजखिळा येथे पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यापूर्वीच पालखी उंडवडीच्या माळावर मुक्कामी असल्यामुळे तंबू उभारण्यासाठी दिंडीतील गाड्या पुढे आल्या. या परिसरात जवळपास दीडशेहून अधिक तंबू उभारण्यात आले. भैरवनाथ प्रासादिक दिंडी अष्टापूर (ता. हवेली) च्या तंबूमध्ये महिला स्वयंपाक बनवित होत्या. अचानक तंबूला आग लागली. त्यामुळे त्या तंबूसह शेजारचे सहा तंबूंनी पेट घेतला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. गॅसच्या टाक्या देखील तंबूतच होत्या. याची माहिती तातडीने पालखी समवेत असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला समजल्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 
 
राधाबाई जेवरे, द्वारकाबाई सूर्यवंशी, मिराबाई अहिवळे यांच्यासह पाच ते सहा महिला स्वयंपाक करीत होत्या. त्यावेळी अचानक गॅसचा भडका उडाला. त्यामुळे तंबूने पेट घेतला. या महिलांनी प्रसंगावधान राखून तातडीने तंबू बाहेर पडल्या. त्यांनी घडत असलेला प्रकार दिंडी प्रमुखांना कळवला. याच दिंडीच्या शेजारी भक्ती शक्ती प्रासादिक दिंडीचे प्रमुख मनोज मुळीक होते. त्यांनी तातडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाची गाडी आत आणण्यासाठी उभारण्यात आलेले तंबू तातडीने काढण्यात आले. अवघ्या पाच ते दहा मिनिटात आग विझविण्यात आली. तोपर्यंत सहा तंबू जळून खाक झाले. या परिसरात जवळपास दीडशेहून अधिक तंबू टाकण्यात आले होते. वेळेत अग्निशमन यंत्रणा आल्याने पुढचा अनर्थ टळला.

 

Web Title: Tukaram burnt due to gas flutter in Tukaram Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.