तुकाराम मुंढेंची आयुक्तपदावरुन बदली
By Admin | Published: March 24, 2017 10:36 PM2017-03-24T22:36:04+5:302017-03-24T22:49:52+5:30
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेले नवी मुंबई महापालिकेचे तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर एस. रामास्वामी नवे पालिका आयुक्त होणार आहेत
ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 24 - गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेले नवी मुंबई महापालिकेचे तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर एस. रामास्वामी नवे पालिका आयुक्त होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत असणारे तुकाराम मुंढे यांची सर्वपक्षीय दबावामुळे बदली झाल्याचे बोललं जातं आहे. मुंढे यांनी अनिधिकृत बांधकामविरोधात आक्रमक मोहिम राबवल्यामुळे सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांनेगी पालिका सभागृहात मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्यांची होणारी बदली लांबली. शेवटी मुंढे यांची आज राज्य सरकारकडून बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी पुणे येथे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक या पदावर असलेले एन. रामस्वामी यांची वर्णी लावण्यात आली आहे. मुंढे यांच्या बदलीचे येत्या काळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंढे यांची बदली नेमकी कुठे करण्यात आली, याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई पालिका आयुक्तपदाची सूत्रं हाती घेताच अनधिकृत बांधकामं, अतिक्रमणं, भ्रष्टाचार यांना वेसण घालण्यासाठी कठोर पावलं उचलली होती. तिथेच वादाची ठिणगी पडली आणि मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकजूट पाहायला मिळाली.