Video : तुकाराम मुंढेंनी कार्यालय सोडले अन् नाशिकच्या महापौरांनी फटाके फोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 01:24 PM2018-11-22T13:24:00+5:302018-11-22T13:31:20+5:30
मुंढे यांना आज सकाळपर्यंत बदलीसंदर्भात कुठलिही लेखी ऑर्डर मिळाली नव्हती. त्यामुळे, मुंढेंनी नेहमीप्रमाणे सकाळी महापालिका आयुक्त कार्यालय गाठले.
नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना बदलीचे पत्र मिळताच त्यांनी आपले आयुक्त कार्यालय सोडले. मुंढेंनी आयुक्त कार्यालय सोडल्याची बातमी कळताच, नाशिकच्यामहापौर रंजना भानसी यांच्या बंगल्याबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांनी महापौर रंजना भानसी यांच्या रामायण या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
मुंढे यांना आज सकाळपर्यंत बदलीसंदर्भात कुठलीही लेखी ऑर्डर मिळाली नव्हती. त्यामुळे, मुंढेंनी नेहमीप्रमाणे सकाळी महापालिका आयुक्त कार्यालय गाठलं. त्यावेळी, आपलं जे दैनंदिन काम आहे, ते चालूच राहणार, असे म्हणत त्यांनी नाशिक महापालिका आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप केला. मात्र, त्यानंतर काही वेळातच मुंढे यांना बदलीचे पत्र मिळाले. त्यानंतर मुंढेंनी आयुक्त कार्यालय सोडून नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्याकडे आपला पदभार दिला. मात्र, मुंढेंनी महापालिका आयुक्त कार्यालय सोडताच भाजप समर्थकांनी फटक्यांची आतषबाजी केली. महापौर रंजना भानसी यांच्या रामायण या निवास्थानाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनीही मुंढेंच्या बदलीवर समाधान व्यक्त केल आहे. नगरसेवकांसोबत मुंढेचा वाद असल्याचे मान्य करताना, नगरसेवकांनी केलेली कामे मुंढेंनी रद्द केल्याचं भानसी यांनी म्हटले. तसेच मुंढेंच काम हे हिटलरशाहीप्रमाणे सुरू होते, त्यामुळे आम्ही त्यांच्या बदलीची मागणी केली होती, असेही भानसी यांनी म्हटले आहे. दरम्यान, नाशिकचे महापालिका आयुक्त म्हणून उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती केल्याचे समजते.