नवीन वर्षात तुकाराम मुंढेंची बदली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2016 01:19 AM2016-12-30T01:19:20+5:302016-12-30T01:19:20+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची पुन्हा जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाले असून, नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात
नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची पुन्हा जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाले असून, नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ते नवी मुंबईतून बदलून जातील, असे खात्रीलायक वृत्त आहे.
आपल्या बेधडक निर्णयामुळे आयुक्त तुकाराम मुंढे सुरुवातीपासूनच वादात सापडले आहेत. याचाच परिणाम म्हणून काही महिन्यांपूर्वी त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव पारित करून तो मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावानंतरही मुंढे यांना आयुक्त पदावर कायम ठेवले होते. मात्र नियमांनुसार त्यांची बदली अटळ असल्याचे मानले जात आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या बदलीच्या वावड्या उठविल्या जात आहेत. विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाच्या पहिल्या आठवड्यात त्यांची बदली होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या बदलीसाठी शिवसेना आग्रही असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)