तुकोबांचा सोहळा रोटी घाटातून मार्गस्थ

By admin | Published: June 26, 2014 10:31 PM2014-06-26T22:31:21+5:302014-06-26T22:31:21+5:30

ज्ञानोबा माऊली, तुकाराम या जयघोषात आणि टाळमृदंगाच्या गजरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्य़ाने पाटस-रोटी चढाचा घाट पार केला.

Tukoba ceremony takes place through roti ghat | तुकोबांचा सोहळा रोटी घाटातून मार्गस्थ

तुकोबांचा सोहळा रोटी घाटातून मार्गस्थ

Next
>पाटस : ज्ञानोबा माऊली, तुकाराम या जयघोषात आणि टाळमृदंगाच्या गजरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्य़ाने पाटस-रोटी चढाचा घाट पार केला. साधारणत: 2 तास वळणदार घाटात विठूनामाचा गजर सुरू होता. टाळमृदंगाच्या निनादात डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन महिला वारकरी बेभान नाचत होत्या. तर काही पुरुष मंडळी आणि महिला फुगडय़ा खेळण्यात दंग झाल्या होत्या. भगवे ध्वज आणि वारकरी भक्तांचा जथा यामुळे पाटस-रोटी वळणदार घाटातील नयनमनोहरी दृश्य होते. 
दरम्यान रोटी गावच्या शितोळे, सुभाष रंधवे, विकास ताकवणो, योगेंद्र शितोळे, साहेबरा वाबळे, नामदेवराव तोंडे पाटील, सावळाराम वायाळ, पंढरीनाथ पासलकर, अरुणमामा भागवत, डॉ. मधुकर आव्हाड, मंगेश दोशी, शिवाजी ढमले, विठ्ठल शिंदे, दादासाहेब केसकर, डॉ. तुकाराम जाधव, डॉ. अनिल लोणकर,  शहाजी चव्हाण, भिमराव भागवत, संभाजी देशमुख, अशोक पानसरे, भाऊसाहेब बंदिस्टी, शांताराम कड, प्रशांत शितोळे, नामदेवराव शितोळे यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. नंतर पालखी ग्रामदैवत श्री नागेश्वराच्या मंदिरात विसाव्याला होती. यावेळी पालखीला संजयतात्या देशपांडे कुटुंबियांच्या वतीने परंपरेनुसार नैवेद्य देण्यात आला. तर पालखी मार्गाव अशोक गुजर यांनी नयन मनोहरी रांगोळी रेखाटलेली होती. तुकाराम महाराजांच्या पालखी आगमनामुळे पाटस गावाला यात्रेचे स्वरुप आले होते. जनसेवा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामस्थांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. पूजा डेअरीच्या वतीने दूध वाटप करण्यात आले. 
श्रीनागेश्वर जीप व्हॅन चालक मालक संघटना, श्री नागेश्वर टेम्पो चालक मालक संघटनेच्या वतीने अल्पोहार आणि चहा 
देण्यात आला. तर ग्रामस्थांच्या वतीने भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. साधारणत: अडीच तासाच्या विसाव्यानंतर पुढे पालखी
रोटी घाटात मार्गस्थ झाली.
 दरम्यान टोल नाक्यावर राजेंद्रसिंह भाटी यांनी पालखीचे स्वागत करुन वारक:यांना अल्पोहार देण्यात आला.  
 
4टाळमृदंगाच्या निनादात डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन महिला वारकरी बेभान नाचत होत्या. तर काही पुरुष मंडळी आणि महिला फुगडय़ा खेळण्यात दंग झाल्या होत्या. भगवे ध्वज आणि वारकरी भक्तांचा जथा यामुळे पाटस-रोटी वळणदार घाटातील नयनमनोहरी दृश्य होते. 
 
4एरवी ढगाळ वातावरणात किंवा पावसाच्या सरीतून घाट पार करणा:या या पालखी सोहळ्य़ाला रखरखत्या उन्हात घाट पार करावा लागल्यामुळे वारकरी भक्त थकलेल्या अवस्थेत दिसून आले. मजल दरमजल करीत हा पालखी सोहळा पुढे रोटी गावाकडे मार्गस्थ झाला. 

Web Title: Tukoba ceremony takes place through roti ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.