तुकोबा पालखी पंढरपूर तालुक्यात

By admin | Published: July 25, 2015 01:31 AM2015-07-25T01:31:10+5:302015-07-25T01:31:10+5:30

गुरुवारचा माळशिरस तालुक्यातील बोरगावचा मुक्काम संपवून बोंडले येथील धाव्याचा आनंद घेत वारकऱ्यांचा सोहळा पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे विसावला़

Tukoba Palikhi in Pandharpur taluka | तुकोबा पालखी पंढरपूर तालुक्यात

तुकोबा पालखी पंढरपूर तालुक्यात

Next

शहाजी फुरडे-पाटील
 पिराची कुरोली (सोलापूर)
सिंचनकरिता मूळ,वृक्ष ओलावे सकळ,
नको पृथकाचे भरी, पडो एक सार धरी,
पान चोऱ्याचे पार, वरील दाटावे ते थोर,वश झाला राजा,
मग आपल्या त्या प्रजा,एक आतुडे चिंतामणी,
फिटे सर्व सुख धनी,तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा...
गुरुवारचा माळशिरस तालुक्यातील बोरगावचा मुक्काम संपवून बोंडले येथील धाव्याचा आनंद घेत वारकऱ्यांचा सोहळा पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे विसावला़ वारकरी ज्ञानोबा- तुकारामांचा गजर करीत होता़
पालखी सोहळा बोंडल्याच्या दिशेने जात असताना गावाच्या अलीकडे डोंगराच्या उतारावर संत तुकाराम महाराजांना पंढरपुरातील विठ्ठल मंदिराचे शिखर दिसले होते, अशी वारकऱ्यांची धारणा आहे़ त्यामुळे पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेला वारकरी तुकोबा-तुकोबा असा जयघोष करीत धावत होता़ या उतारावर बाळासाहेब मोरे महाराज, ह़भ़प़ पुंडलिक मोरे महाराज देहूकर, काकासाहेब चोपदार हे एकेका दिंडीला धावण्यासाठी सोडत होते़ संत तुकाराम महाराजांची पालखी दसूर पाटी येथून टप्पा येथे विठ्ठलाचे साम्राज्य असलेल्या पंढरपूर तालुक्यात दाखल झाली.सुमारे २२५ किमीचे अंतर पायी चालत आलेला हा सोहळा हिरव्यागार अशा पिराची कुरोली पालखी तळावर विसावला़

Web Title: Tukoba Palikhi in Pandharpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.