मोरोपंत नगरीत विसावले तुकोबाराय

By admin | Published: June 27, 2014 10:37 PM2014-06-27T22:37:04+5:302014-06-27T22:37:04+5:30

डोळ्य़ात दाटलेला भक्तीचा भाव आणि विठ्ठल दर्शनाची लागलेली ओढ प्रत्येकाला वारीमध्ये चालण्याचे बळ देत आहे.

Tukobaray in Moropant town | मोरोपंत नगरीत विसावले तुकोबाराय

मोरोपंत नगरीत विसावले तुकोबाराय

Next
>बारामती :
विठूचा गजर 
हरीनामाचा गजर 
ङोंडा रोवीला.. ङोंडा रोवीला 
असा डोळ्य़ात दाटलेला भक्तीचा भाव आणि विठ्ठल दर्शनाची लागलेली ओढ प्रत्येकाला वारीमध्ये चालण्याचे बळ देत आहे. या आनंदमेळ्य़ात चालत असताना भक्तीरसात न्हालेले सारेच लहानथोर विठ्ठलाच्या ओढीने पंढरीची वाट चालताना दिसत आहेत. बारामतीमध्ये दाखल झालेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्य़ात अकरा  वर्षाच्या लहान वारक:यापासून ते शंभरी पार केलेले वृध्द वारकरीही तेवढय़ाच भक्तीभावाने वारीची वाट आनंदाने चालत आहेत. ‘ बा.. विठ्ठला पाऊस पडू दे रान शिवार फुलू दे’ अशी मनात आस ठेवत हे वारकरी आपल्या भोळ्य़ा भक्तीने विठूरायाला साकडे घालीत आहेत. तसेच ‘जाता पंढरीशी सुख वाटे जीवा’ अशी भावनाही वारक:यांच्या चेह:यावर दिसत होती.  ‘लोकमत’शी बोलताना  अशाच काही भाववेडय़ा वारक:यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज सायंकाळी पाटस मार्गावरील  पांढरीच्या महादेव मंदिराजवळ आगमन झाले.  श्री तुकोबांच्या पालखीचे स्वागत नगराध्यक्षा जयश्री सातव यांनी पुष्पहार घालून केले.  
उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, योगेश जगताप सुभाष ढोले,  किरण  गुजर, इम्तीयाज शिकिलकर  नगर पालिकेच्या विविध समित्यांचे सभापती, उपसभापती, नगरसेवक, नगरसेविका, माजी नगरसेवक, उपविभागीय अधिकारी  संतोष जाधव, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम,  मुख्याधिकारी रवी पवार, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, शासकीय अधिकारी, कर्मचारी,  विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरपालिकेचे  अधिकारी, कर्मचारी आदींनी पुष्पहार अर्पण करुन पालखीचे स्वागत केले. शहरातील शारदा प्रांगणात पालखी सोहळा सायंकाळी विसावला. यावेळी टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्र पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
नगरपालिका, विविध तरुण मंडळे व विविध स्वयंसेवी संस्था यांच्या कडून पालखीतील वारक:यांना चहा-नाष्टा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.  नगरपालिकेने पालखीचा मुक्काम असलेल्या शारदा प्रांगण, वारक:यांच्या मुक्काम असलेल्या सांस्कृतिक भवन व नगरपरिषदेच्या शाळांमध्ये तसेच शहरात पाणी, वीज व स्वच्छतेची व्यवस्था  केली होती.   वारक:यांना सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालय, रुई हॉस्पिटल, डॉक्टरांची प्रबोधिनी तसेच सेवाभावी संस्था यांच्यामार्फत रुग्ण सेवा देण्यासाठी शासकीय रुग्णालयाने खास वॉर्ड तयार केला होता.  तसेच 24 तास वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, आरोग्य पथके,  वैद्यकीय कर्मचारी पथक उपलब्ध करुन दिले होते. 
 पालखीचे  प्रस्थान झाल्यावर काटेवाडी येथे मेंढ्यांचे रिंगण होणार आहे.  पालखीचा पुढील मुक्काम सणसर येथे होणार आहे.  
 
इंदापूर तालुक्यातील वडाचामाळ येथील राहणारा आणि वारीमध्ये गेल्या दोन वर्षापासून चालणारा अमोल रामा वाघमोडे हा अकरा वर्षाचा वारकरी आपल्या घरातील वारीची परंपरा जोपासत आहे. त्याच्या बरोबर बारावीत शिकणारा चुलत भाऊ गंगाराम आणि बहिन काजलही या वारीमध्ये विठ्ठलाच्या ओढीने चालत आहेत. अमोल म्हणतो या वारीमध्ये चालताना आनंद तर होतोच परंतु प्रत्येक वर्षी वारी कधी येते असे देखील होते. गावाकडे पाऊस नाही त्यामुळे लवकर पाऊस पडू दे असे सारखे मी विठूरायाला विनवतो आहे. 
- अमोल रामा वाघमोडे 
 
4नगरपालिका, विविध तरुण मंडळे व विविध स्वयंसेवी संस्था यांच्या कडून पालखीतील वारक:यांना चहा-नाष्टा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.  नगरपालिकेने पालखीचा मुक्काम असलेल्या शारदा प्रांगण, वारक:यांच्या मुक्काम असलेल्या सांस्कृतिक भवन व नगरपरिषदेच्या शाळांमध्ये तसेच शहरात पाणी, वीज व स्वच्छतेची व्यवस्था  
केली होती.  
 
या वारीमध्ये इंदापूर तालुक्यातील  अकोले गावचे रहिवाशी असलेले मारूती तुकाराम दराडे यांना आपण वारीमध्ये कधीपासून चालत आहोत तेच आठवत नाही. ‘विठ्ठलाने मला आजर्पयत भरभरून दिले. कोणतीही अपेक्षा नाही, आता फक्त विठ्ठलाच्या ओढीने पंढरीला जायचे. शंभरी गाठत आलो आता चालणो होत नाही. परंतु, विठ्ठल भक्तीची आस कायम आहे. पेटीमास्तर म्हणून भजनी मंडळामध्ये दहा वर्षाचा असल्यापासून जात होतो. तेंव्हा पासून वारीची गोडी लागली आहे. 
- मारुती तुकाराम दराडे
 
परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असणा:या हरीमहाराज राणोर गोविंदपूरवाडीकर यांनी तर शंभरी पार केली आहे. त्यांनी स्वत:चे वय 125 असल्याचा दावा केला आहे. ‘ऐवढे वय झाले तरी मी चालतच वारी करतो गाडीत बसत नाही. विठ्ठलाने माझं शरीर तेवढ तगडं ठेवल आहे. वारीत देव आसतू..’ असेही हे आजोबा आवजरुन सांगतात. स्वत: दिंडी चालक असलेले हरीमहाराज  ‘पंढरीसी जाताना सुख वाटते. वारीत देव भेटल्यातचा भास होतो’ असेही सांगतात.  
- हरीमहाराज राणोर गोविंदपूरवाडीकर 
 
सोरपतवाडी तालुका दौंड येथील रहिवाशी असणारा विनोद मागील दोन वर्षापासून वारीमध्ये चालत आहे. ‘वारीची परंपरा घरात आहे. आता वयामुळे आई-वडिलांना चालने होत नाही. मागच्या वर्षी घराण्याची परंपरा म्हणून एक औपचारिकता म्हणूनन आलो होतो. मात्र वारीची आता गोडी लागली आहे. त्यामुळे ही परंपरा आता कायम जोपसणार आहे.’ 
- विनोद मुळीक
 
दौंड तालुक्यातील पाटस येथे राहणा:या सीताबाई दत्तात्रय पागळे गेल्या दहा वर्षापासून वारीमध्ये चालत आहेत. ‘पाऊस लांबल्याने पेरण्या झाल्या नाहीत त्यामुळे चिंता वाटते मात्र विठ्ठल नक्कीच आमचं गा:हाण ऐकेल त्याला काही सांगायची गरज नाही. देवाला कधी काही सांगावही लागत नाही. पाऊस नक्की पडेल.’ अशी भोळी आशा घेऊन चालणा:या या आजींचा पालखीत चालण्याचा उत्साह मात्र अजिबात कमी होत नाही. - सीताबाई पागळे
 

Web Title: Tukobaray in Moropant town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.