२३ सप्टेंबरपासून तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा
By Admin | Published: August 31, 2016 07:25 PM2016-08-31T19:25:13+5:302016-08-31T19:25:13+5:30
राज्यासह देशातील कानाकोपऱ्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव २३ ते १७
ऑनलाइन लोकमत
तुळजापूर, दि. 31 - राज्यासह देशातील कानाकोपऱ्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव २३ ते १७ आॅक्टोबर या कालावधीत होत आहे़ २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार असून, नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत़
साडेतीन शक्तीपिठापैकी पूर्ण शक्तीपीठ म्हणून तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीला ओळखले जाते. देवीचा वर्षातून दोनवेळा महोत्सव असतो. यंदाचा शारदीय नवरात्र महोत्सव २३ सप्टेंबर ते १७ आॅक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी देवीची मंचकी निद्रा सुरू होते़ त्यानंतर ९ दिवसांनी म्हणजे १ आॅक्टोबर रोजी पहाटे देवी मंचकी निद्रेतून सिंहासनावर प्रतिष्ठान होते. दुपारी १२ वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापना करून ब्राम्हणास अनुष्ठानाची वर्णी दिली जाते. रात्री देवीचा छबीना निघतो. २ आॅक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबीना, ३ आॅक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबीना, ४ आॅक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबीना, ५ आॅक्टोबर रोजी देवीच्या नित्योपचार पुजेनंतर रथालंकार महापूजा व रात्री छबीना, ६ आॅक्टोबर रोजी ललिता पंचमी आल्याने सकाळी देवीची नित्योपचार पूजा व नंतर मूर्ती अलंकार महापूजा, रात्री छबीना, ७ आॅक्टोबर रोजी सकाळी देवीची नित्योपचार पूजा, त्यानंतर शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबीना, ८ आॅक्टोबर रोजी सकाळी नित्योपचार पूजा, भवानी अलंकार महापूजा व रात्री छबीना, ९ आॅक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा, दुर्गाष्टमी आल्याने दुपारी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा, सायंकाळी ५ वाजता वैदिक होमास व हवनास प्रारंभ होणार आहे़ तर रात्री १०.३५ वाजता पूर्णाहुतीचा विधी व नंतर रात्री छबीना निघणार आहे़
१० आॅक्टोबर रोजी नित्योपचार पूजा, महानवमी निमित्त दुपारी १२ वाजता होमावर धार्मिक विधी व घटोत्थापना होणार आहे़ रात्री नगरहून येणाऱ्या पलंग पालखीची मिरवणूक तर ११ आॅक्टोबर रोजी विजयादशमी दसरा उष:काली देवीची शिबीकारोहन सिमोल्लंघन होणार आहे़ त्यानंतर १५ आॅक्टोबर रोजी पाच दिवसाच्या मंचकी निद्रेनंतर पहाटे देवीची प्रतिष्ठापना व कोजागिरी पौर्णिमा़ १६ आॅक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा व रात्री सोलापूरच्या काट्यासह छबीना, १७ आॅक्टोबर रोजी सकाळी नित्योपचार पूजा व महाअन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे़