‘आई राजा’च्या जयघोषात तुळजाभवानीचे सिमोल्लंघन

By Admin | Published: October 11, 2016 08:38 PM2016-10-11T20:38:24+5:302016-10-11T22:11:52+5:30

कुंकवाची उधळण करीत, आपट्या पाने वाटून संबळाच्या वद्यात आणि आई राजा उदो ऽऽ उदो ऽऽऽ चा जयघोषात मंगळवारी पहाटे श्री तुळजाभवानी देवीचा सिमोल्लंघन

Tulajbhavani's symohalnhan in the auspicious 'Ii King' | ‘आई राजा’च्या जयघोषात तुळजाभवानीचे सिमोल्लंघन

‘आई राजा’च्या जयघोषात तुळजाभवानीचे सिमोल्लंघन

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
तुळजापूर, दि.11 -  कुंकवाची उधळण करीत, आपट्या पाने वाटून संबळाच्या वद्यात आणि आई राजा उदो ऽऽ उदो ऽऽऽ चा जयघोषात मंगळवारी पहाटे श्री तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी हजारो भाविक सहभागी झाले होते. त्यानंतर तुळजाभवानी देवीच्या पाचदिवसीय श्रमनिद्रेस प्रारंभ झाला.
तत्पूर्वी रात्री बारा वाजता अभिषेक पुजेसाठी घाट झाली व पंचामृत अभिषेकास प्रारंभ झाला. त्यानंतर रात्री दोन वाजता भोपे पुजारी व महंतांनी देवीस १०८ साड्यांचा दिंड बांधला. दरम्यान, नगरून आलेल्या पलंग व पालखीचे स्वागत मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले. शहरातील किसान चौक, आर्य चौक, महाद्वार चौक मार्गे पलंग व पालखी मंदिरात वाजत-गाजत दाखल झाल्यानंतर देवीची आरती, धुपारती व धार्मिक विधी पार पडले. यानंतर भोपे पुजाऱ्यांनी देवीची मूर्ती नगरहून आलेल्या पालखीत ठेवून ‘आई राजा उदो उदो’ च्या जयघोषात मंदिर प्रदक्षिणा पार पडली.
दरम्यान, पिंपळपारावर पालखीस विसाव्यास ठेवण्यात आले. यावेळी मानाच्या आरत्या, नैवेद्य आदी विधी होवून देवीस आपट्याची पाने वाहण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी कुंकवाची उधळण करीत देवीचा जयघोष केला. या सीमोल्लंघनानंतर देवीमूर्तीस पालखीतून सिंहगाभाऱ्यातील नवीन पलंगावर श्रमनिद्रेसाठी ठेवण्यात आले. यापुढील पाच दिवस देवीची श्रमनिद्रा सुरू राहणार आहे. यानंतर शासकीय आरती व भोप्यांची आरती पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, तसीलदार सुजीत नरहरे, दिलीप नाईकवाडी यांनी आरती करणाऱ्यांना श्रीफळ प्रसाद दिला़ तसेच पलंग पालखीतील पलंगे व भगत यांनाही भरपेहराव आहेर देण्यात आल्यानंतर सिमोल्लंघनाची सांगता झाली. यावेळी दोन्ही महंत, भोपी पुजारी अमर परमेश्वर, शशिकांत पाटील, संजय सोंजी, भाऊसाहेब मलबा, अतुल मलबा, मोहन पाटील, दिलीप उदाजी, सुधीर कदम, दिनेश परमेश्वर यांच्यासह पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, प्रक्षाळ मंडळाचे विशाल रोचकरी, किशोर गंगणे, ऋषी मगर, सुधीर रोचकरी, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक दीपाली घाडगे, पोनि राजेंद्र बोकडे, तहसीलदार दिनेश झांपले, नगरचे विजय भगत, राजू भगत, महेश भगत, सचिन भगत, पलंगवाले बाबूराव पलंगे, आनंद पलंगे, गणेश पलंगे, उमेश पलंगे यांच्यासह सेवेकरी, पुजारी, उपाध्ये, आराधी, गोंधळी व भाविक उपस्थित होते.

Web Title: Tulajbhavani's symohalnhan in the auspicious 'Ii King'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.