Tunisha Sharma: लव्ह जिहादचा अँगल निघाला तर...तुनिशा आत्महत्या प्रकरणात आमदार राम कदमांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 02:05 PM2022-12-25T14:05:55+5:302022-12-25T14:07:01+5:30

Tunisha Sharma: तुनिशाचा कथित बॉयफ्रेंड शिझान खानवर आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

Tunisha Sharma: If the angle of love jihad comes out... MLA Ram Kadam's big statement on Tunisha suicide case | Tunisha Sharma: लव्ह जिहादचा अँगल निघाला तर...तुनिशा आत्महत्या प्रकरणात आमदार राम कदमांचे मोठे वक्तव्य

Tunisha Sharma: लव्ह जिहादचा अँगल निघाला तर...तुनिशा आत्महत्या प्रकरणात आमदार राम कदमांचे मोठे वक्तव्य

googlenewsNext

Tunisha Sharma: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिच्या मृत्युमुळे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. तुनिशा हिने तिच्या शोच्या सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली, त्यामुळे खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्याच केली की तिचा घातपात झाला, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, तुनिशाच्या आईने तिचा मित्र शिझान खानवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शिझानला अटक केली आहे.

राम कदम काय म्हणाले?
तुनिशा शर्माने टीव्ही मालिकेच्या शूटिंगदरम्यान सेटवरच तिचा मित्र शिझान खानच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या केली. तुनिशाच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, शिझान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तुनिशा डिप्रेशनमध्ये होती. यामुळे ती अनेकदा डिप्रेशनच्या गोळ्या घेत असे. दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी याप्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे. मुलीच्या कुटुंबीयांना नक्कीच न्याय मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. लव्ह जिहादचे अँगल निघाले, तर त्या बाजूनेही तपास केला जाईल, असे ते म्हणाले.

लव्ह जिहाद अँगल?
तुनिशा आत्महत्या प्रकरणात आता लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या प्रकरणात लव्ह जिहादचा अँगल समोर आला तर नक्कीच चौकशी केली जाईल, असे भाजपचे आमदार राम कदम यांचे म्हणणे आहे. तुनिशाच्या आत्महत्येमागील कारण शिझान खानसोबतचे ब्रेकअप असल्याचे सांगितले जात असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तुनिशाच्या आईनेही सांगितले की, शिझानमुळेच तुनिशा खूप नैराश्यात होती.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये काय

पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार तुनिशा शर्माचा मृत्यू हा श्वास गुदमरल्यामुळे झाला आहे. गळफास लावल्यानंतर श्वास गुदमरल्याने तुनिशा हिचा मृत्यू झाला. तिच्या शरीरावर अन्य कुठल्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा आढळलेल्या नाहीत. तुनिशा हिने आत्महत्या केल्यानंतर ती गर्भवती असल्याच्या अफवा उडाल्या होत्या. मात्र ती गर्भवती असल्याची बाब पोलीस सूत्रांनी फेटाळून लावली आहे.

Web Title: Tunisha Sharma: If the angle of love jihad comes out... MLA Ram Kadam's big statement on Tunisha suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.