तूर उत्पादन प्रोत्साहन कार्यक्रम

By admin | Published: November 7, 2015 02:53 AM2015-11-07T02:53:40+5:302015-11-07T02:53:40+5:30

गत काही दिवसांपासून तूर डाळीवरून माजलेल्या हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने तुरीच्या उत्पादन वाढीसाठी विशेष योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत

Tur product promotion program | तूर उत्पादन प्रोत्साहन कार्यक्रम

तूर उत्पादन प्रोत्साहन कार्यक्रम

Next

- नीलेश शहाकार,  बुलडाणा
गत काही दिवसांपासून तूर डाळीवरून माजलेल्या हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने तुरीच्या उत्पादन वाढीसाठी विशेष योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये तूर उत्पादन प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना तूर बियाणे पुरविण्यात येणार असून, पीक संरक्षणासाठी अर्थ साहाय्यही देण्यात येणार आहे.
यावर्षी राज्यात साधारण १२ लाख हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड करण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केले होते; परंतु आॅक्टोबरपर्यंत राज्यात अवघ्या ४.८५ लाख हेक्टर क्षेत्रावरच तुरीची लागवड झाली. महाराष्ट्रात गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन खूपच कमी झाले. यंदा त्यातही आणखी २५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात २०१३-१४ या वर्षात डाळीचे एकूण उत्पादन ३१६९ हजार टन एवढे झाले होते. ते २०१४-१५ या वर्षात १८६५ हजार टनापर्यंत खाली आले.
मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याचा लाभ उचलत तूर डाळीची मोठ्या प्रमाणात साठेबाजी व काळाबाजार होत आहे. परिणामी गत काही दिवसांपासून, तूर डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. राज्यातील बहुतांश जनता प्रथिनांची गरज भागविण्यासाठी तूर डाळीवरच अवलंबून आहे.
भविष्यात तूर लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविणे, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, या उद्देशाने २०१५-१६ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यातील १६ जिल्ह्णांमध्ये संकरीत तूर उत्पादन प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

Web Title: Tur product promotion program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.