ऑनलाइन पेपर तपासणी बंद करा; अभाविपचा भाजपला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 12:46 AM2019-12-30T00:46:26+5:302019-12-30T06:42:51+5:30

राज्यात भाजपप्रणीत सरकार सत्तेवर असताना प्रवेशप्रक्रियेचा बोजवारा उडाला होता.

Turn off online paper checking; BJP is home to Abhayavip | ऑनलाइन पेपर तपासणी बंद करा; अभाविपचा भाजपला घरचा आहेर

ऑनलाइन पेपर तपासणी बंद करा; अभाविपचा भाजपला घरचा आहेर

Next

ठाणे : मुंबई विद्यापीठाला ऑनलाइन पेपरतपासणी प्रक्रिया राबवणे जमत नसेल, तर त्यांनी पूर्ववत ऑफलाइन प्रक्रियेकडे वळावे. मात्र, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये, असे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी व्यक्त केले. राज्यात भाजपप्रणीत सरकार सत्तेवर असताना प्रवेशप्रक्रियेचा बोजवारा उडाला होता. त्या पार्श्वभूमीवर आता अभाविपने आयोजित केलेल्या ५४ व्या कोकण प्रदेश अधिवेशनाच्या खुल्या अधिवेशनात ही मागणी केली. ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या गोंधळाबाबत छात्रनेत्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

अधिवेशनाचा दुसरा दिवस शनिवारी रंगला. दुपारी आयोजित केलेली शोभायात्रा घाणेकर नाट्यगृहापासून सुरू होऊन प्रबोधनकार ठाकरे मैदानाजवळ समाप्त झाली. त्यानंतर, या मैदानात खुले अधिवेशन पार पडले. सुरुवातीला छात्रनेते अमित ढोमसे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर टीका केली. विद्यापीठाने पूर्वतयारीशिवाय केलेल्या आॅनलाइन पेपरतपासणीचा निर्णय सामान्य विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झाला. अनेक विद्यार्थ्यांना या आॅनलाइन तपासणीचा फटका बसला असून पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी नवीन समस्या उत्पन्न झाल्या. या साऱ्या प्रकाराचा निषेध करीत विद्यापीठाकडे प्रवेशप्रक्रि येत सुधारणा करण्याची मागणी केली. राज्यातील भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या आॅनलाइन पेपरतपासणी प्रक्रियेत घोळ होऊन विद्यार्थ्यांचे हाल झाले होते. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तर भाजपने विधानसभेची उमेदवारी नाकारली. ती नाकारण्याच्या अन्य अनेक कारणांबरोबर शिक्षण विभागातील गोंधळ हे कारण होते.
गोव्याचे छात्रनेते किसन मंगेशकर यांनी कोकणातल्या रस्त्यांची दुर्दशा व गोव्यातील कॅसिनोच्या संख्येबद्दल मत मांडले. छात्रनेते ज्ञानेश्वर पवार यांनी सीएएचे समर्थन करत विद्यार्थ्यांना याविषयी जागरूक राहण्यास सांगितले. छात्रनेते नीरज कुरकुंडे यांनी विद्यापीठाकडे उपकेंद्राची मागणी केली. प्रदेशमंत्री प्रेरणा पवार हिनेही मत मांडले. मंचावर कोकण प्रांताध्यक्ष प्रा. मंदार भानुशे आदी उपस्थित होते.

वसतिगृहांची आवश्यकता
छात्रनेते निखिल जाधव यांनी विद्यापीठाच्या वसतिगृहाविषयी भाष्य केले. बाहेरून येणाºया विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आज मुंबई विद्यापीठाची केवळ १० वसतिगृहे आहेत, त्यापैकी काही वसतिगृहांत किमान सोयीसुविधा नाहीत.
विद्यापीठाने अधिक संख्येने वसतिगृह बांधण्याची मागणी त्यांनी केली. यासोबतच रागिनी कुर्मी यांनी सरकारकडे मेट्रो ट्रेन प्रोजेक्ट लवकरात लवकर अमलात आणण्याबाबत सुचवले. विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासासाठी योग्य त्या सवलती देण्याची मागणी केली.

Web Title: Turn off online paper checking; BJP is home to Abhayavip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.