लय कुटाणा झालाय : रद्द नोटांच्या निर्णयात ऊसतोडणी कामगार होरपळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2016 01:47 AM2016-11-17T01:47:14+5:302016-11-17T01:47:14+5:30

काळा पैसा बंद होतुय चांगलच झालं, पन लोकांच हाल झालं. पैशेच मोकळं व्हायना. लय कुटाणा झालाय, बंद पैसं मोडायंच कुठं.

Turnaround: Suffrage workers are injured in the decision of canceled notes | लय कुटाणा झालाय : रद्द नोटांच्या निर्णयात ऊसतोडणी कामगार होरपळले

लय कुटाणा झालाय : रद्द नोटांच्या निर्णयात ऊसतोडणी कामगार होरपळले

googlenewsNext

बारामती : काळा पैसा बंद होतुय चांगलच झालं, पन लोकांच हाल झालं. पैशेच मोकळं व्हायना. लय कुटाणा झालाय, बंद पैसं मोडायंच कुठं. आमच्याकडं काय कसली कार्ड न्हाय आणलेली. दुकानदार नोटा घेइना. गावात असताना व्यवहार फिराफिरी झाली. आता कोनी घेइत नाही, मुकादमाकडं परत दिल्याती, पन ते दीड महिन्यांनी मिळत्यालं, अशी प्रतिक्रिया माळेगाव येथील ऊसतोडणी कामगारांनी व्यक्त केली. नोटा रद्दच्या निर्णयाचे या कामगारांनी स्वागत केले आहे.
केंद्र सरकारने ५००, १००० च्या नोटांच्या बंदीनंतर जनजीवनावर परिणाम झाला आहे. सर्वसामान्यांच्या दैनंदिनीमध्ये विस्कळीतपणा आला आहे. स्थानिक नागरिक वेळ काढून त्यातून मार्ग काढत आहेत. त्यांच्याजवळ असणाऱ्या रद्द केलेल्या नोटा स्थानिकांकडून जवळच्या बँकेत, पोस्टात जमा केल्या जात आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे आधार कार्ड, पॅनकार्ड नागरिक आणत आहेत. त्यामुळे उशिरा का होईना शहरातील स्थानिकांना पैसे मिळत आहेत. मात्र, बहुतांश ऊसतोडणी बीड जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी आले आहेत. वर्षातील पाच महिने त्यांचा मुक्काम साखर कारखाना परिसरात असतो. सुमारे २०० किमी अंतरावरून आलेल्या या कामगारांकडे इथ वास्तव्य करताना कोणतेही शासकीय कागदपत्रं नसतात.
यामध्ये बँकखाते, खाते पुस्तक, आधार कार्ड, रेशनकार्डसह पॅनकार्ड येथे उपलब्ध नसते. काहींनी कार्ड गावाकडे ठेवल्याचे सांगितले.
गावांकडंचच आणलेला किराणा पुरवून आजुन खातुय, पन खर्चायची अडचण झालीय.गावांकड खाती हायती. तर काहींनी मुकादमाकड पैस पाठवल्याती. पैशेच मोकळ व्हायना. लय कुटाणा झालाय, अशी प्रतिक्रिया मूळ जामखेड येथील विठ्ठल पवार यांनी माळेगाव कारखाना येथे व्यक्त केली. तर पैस मोडायचं कुठशीक ती समजना, दुकानदार पैसच घिना, सुट आण म्हणतुय, आन आमच्याकडं बी सुट न्हायत, वाड इकुन आलेल पैस तेवड वापराय घावत्यात, असे पाटोदा येथील बबन बेद्रे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Turnaround: Suffrage workers are injured in the decision of canceled notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.