शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वरळी बंद

By admin | Published: August 31, 2016 11:53 PM2016-08-31T23:53:57+5:302016-08-31T23:53:57+5:30

वाहतूक पोलीस अंमलदार विलास शिंदे यांचे भ्याड हल्ल्यांत निधन झाल्यानंतर वरळीकरांनी गुरुवारी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन केलं

Turning off Worry to carry Shinde's tribute | शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वरळी बंद

शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वरळी बंद

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 31 - वाहतूक पोलीस अंमलदार विलास शिंदे यांचे भ्याड हल्ल्यांत निधन झाल्यानंतर वरळीकरांनी गुरुवारी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन केलं आहे. बंद पाळून विलास शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करताना भ्याड हल्ल्याचा
निषेध करण्याचे आवाहन वरळीकरांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या बंदला पाठिंबा दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितले. त्यामुळे उद्या वरळीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळणार आहे. 

डयुटी बजावत असताना दुचाकीस्वाराकडून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलिस कर्मचारी विलास शिंदे यांचे बुधवारी दुपारी लिलावती रुग्णालयात निधन झाले. वाहतूक पोलिसांकडून सध्या मुंबईतील सगळया वाहनांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

त्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर एक वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी खार एसव्ही रोडवरील पेट्रोल पंपावर डयुटीवर बजावत असताना विलास शिंदे यांनी तिथे आलेल्या दुचाकीस्वाराकडे त्याच्या गाडीची माहिती मागितली. 

 

Web Title: Turning off Worry to carry Shinde's tribute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.