अकलूजच्या घोडेबाजारात पावणेतीन कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 03:38 AM2017-10-30T03:38:32+5:302017-10-30T03:38:38+5:30

पारदर्शी व्यवहार, अर्थिक सुरक्षितता व चांगल्या सुविधांचा लाभ घोडे व्यापारी व ग्राहकांना मिळत असल्याने अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडे बाजाराचा देशभरात नावलौकिक झाला आहे़

The turnover of Akkuja's horse market is around Rs | अकलूजच्या घोडेबाजारात पावणेतीन कोटींची उलाढाल

अकलूजच्या घोडेबाजारात पावणेतीन कोटींची उलाढाल

Next

राजीव लोहोकरे
अकलूज (सोलापूर) : पारदर्शी व्यवहार, अर्थिक सुरक्षितता व चांगल्या सुविधांचा लाभ घोडे व्यापारी व ग्राहकांना मिळत असल्याने अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडे बाजाराचा देशभरात नावलौकिक झाला आहे़ यंदाच्या ९व्या वर्षी अकलूजच्या घोडे बाजारात विक्रमी आवक झाली असून, आतापर्यंत सुमारे २ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
या घोडेयात्रेत सुमारे २ हजार १३० विविध जातींच्या घोड्यांची आवक झाली असून, प्रवासात असलेले सुमारे १ हजार घोडे यात्रेत सहभागी होणार आहेत. या वर्षी मद्रास व पंजाब येथील घोडे शौकीन व व्यापारी अकलूज घोडेयात्रेत येत आहेत.
दरवर्षी २ हजार ५०० ते २ हजार ७०० पंजाबी नुक्रा, मारवाड, काटेवाडी, सिंध आदी जातीवंत घोडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, राजस्थान व राज्यभरातून या यात्रेत दाखल होतात. या यात्रेत सुमारे ७ ते ७ कोटी ५० लाखांची उलाढाल होते़ सुमारे महिनाभर हा घोडे बाजार चालतो.
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह परराज्यातील घोडे शौकीन घोडे खरेदीसाठी या यात्रेत येतात. या यात्रेत घोड्यांच्या चालींच्या व नाचकामाच्या स्पर्धा अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भरविण्यात येतात.

समाधानकारक पाऊस, चाºयाची मुबलकता यामुळे पंढरीत कार्तिकी यात्रेनिमित्त भरणाºया बाजारात खिलार गायी, खोंड, बैल, म्हशी अशी सुमारे तीन हजारांपेक्षा जास्त जनावरे दाखल झाली आहेत. त्यातून यंदा १० कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी वर्तविली आहे़ शेकडोवर्षांची परंपरा असलेला पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणारा जनावरांचा बाजार गतवर्षापासून वाखरी येथील पालखी तळावर हलविण्यात आला आहे़

Web Title: The turnover of Akkuja's horse market is around Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.