राज्यात साखर उद्योगांची उलाढाल ३५ हजार कोटींवर
By admin | Published: October 8, 2016 03:06 PM2016-10-08T15:06:32+5:302016-10-08T15:06:32+5:30
साखर उद्योग हा राज्यातील एक प्रमुख उद्योग बनला असून सन २०१५-१६ या वर्षात या उद्योगात ३५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली
Next
>शिवाजी सुरवसे, ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ८ - साखर उद्योग हा राज्यातील एक प्रमुख उद्योग बनला असून सन २०१५-१६ या वर्षात या उद्योगात ३५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे़ राज्यातील २०० तालुक्यांची अर्थव्यवस्था ऊस आणि साखरेवर अवलंबून आहे़ २० लाख सभासद, २ लाख नोकरदार आणि २६ लाख ऊस उत्पादक असलेल्या या उद्योगाने गेल्यावर्षी शेतकºयांना १६ हजार कोटी रुपये दिले आहेत़ त्यामुळे यंदाच्या वर्षी कमी ऊस असल्यामुळे याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत़
राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि सामाजिक विकासाला साखर उद्योगाचा मोठा हातभार आहे़ देशातील यंत्रमाग उद्योगानंतर साखर उद्योगामध्येच सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून देशात उत्पादित होणाºया साखरेमध्ये राज्यात हिस्सा एक तृतीअंश एवढा मोठा आहे़ देशात गतवर्षी २४७ .२० लाख मेट्रीक टन साखर उत्पादित झाली असून यामध्ये महाराष्ट्राने तब्बल ८४़.१५ लाख मेट्रीक टन (एकूण उत्पादनाच्या ३४ टक्के) साखर उत्पादित केली आहे हे विशेष़
राज्याच्या बºयाच भागात साखर कारखान्यांनी विविध हॉस्पिटल, शाळा महाविद्यालये, लिप्ट इरिगेशन स्किम करुन अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे़ राज्यात १७७ साखर कारखाने असून १५ ते २० लाखांना या कारखानदारीमधून अप्रत्यक्षपणे थेट रोजगार मिळाला असून दोन लाख लोकांना थेट रोजगार मिळाला आहे़ या कारखान्यांनी २२०० मेगावॅट वीज निर्मिती केली असल्यामुळे लोडशेडिंगचा बराचा भार कमी झाला आहे़
१७७ साखर कारखान्यांपैकी ७६ कारखाने हे को-जनरेशन करीत असून त्यांनी २६५कोटी युनिट वीज निर्मिती केली आहे़ आणखी ११२ कारखान्यांना को-जन मंजूर करण्यात आले असून त्यांची २१०३ मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता आहे़ ११० कारखान्यांकडे डिस्टलिरी प्रकल्प सून ते १३६ कोटी लिटर्स चे उत्पादन केले आहे़ सन २०१३-१४ मध्ये १३ हजार ५३३ कोटी, सन २०१४-१५ मध्ये १८ हजार ९८६ कोटी तर गतवर्षी म्हणजेच २०१५-१६ मध्ये १६ हजार २५४ कोटी रुपये श्ेतकºयांना एफआरपी म्हणून दिले असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले़एक हजार कोटी पेक्षा जास्त रकमेची वीज या कारखान्यांनी तयार केली आहे़ इथेनॉल निर्मिती देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे़ बंद कारखाने सुरू करणे, बंद यंत्रमाग सुरू करणे यावर शासनाने लक्ष दिल्याचे यावेळी सुभाष देशमुख यांनी सांगितले़
हरियाणाचे सहकार मंत्री मनीषकुमार गोवर यांनी राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी भेट घेऊन राज्याच्या सहकार खात्याचे कौतुक केले़ साखर आयुक्तालयापासून ते शासनाच्या नियंत्रणापर्यंत आणि सारख कारखानदारीपर्यंतच्या विविध बाबींचे त्यांनी कौतुक केले़हरियाणात हा साखरेचा पॅटर्न राबवू असे ते म्हणाले़
साखर उद्योगाचे बोलके आकडे
-गतवर्षी देशात २४७ लाख मेट्रीक टनाचे साखर उत्पादन
-महाराष्ट्रात २०१५-१६ मध्ये ८४.१५ लाख मेट्रीक टन
-उत्तर प्रदेशचा हिस्सा ६७.१६ लाख मेट्रीक टन
-कर्नाटकचा हिस्सा ४० लाख मेट्रीक टन
-गुजरातने उत्पादित केल ११.०८ लाख मेट्रीक टन साखर
-तामिळनाडूमध्ये बनली ९.९५ लाख मेट्रीक टन साखर
-राज्यात वीज निर्मिती अन् इथेनॉल निर्मिती लक्षणीय
जगात १६४ मिलियन टन साखर
भारतात गेल्यावर्षी म्हणजेच २०१५-१६ या आर्थिक वर्षात २४७ कोटी २० लाख मेट्रीक टन साखर उत्पादित झाली असून यामध्ये महाराष्ट्राचा वाटा खूप मोठा आहे़ जगात सन २०१५-१६ या वर्षात १६४ मिलियन टन साखर उत्पादित झाली आहे़ यामध्ये बाझिलचा हिस्सा २२ टक्के, भारताचा हिस्सा १५.५६ टक्के, थायलंडचा हिस्सा ५.९२ टक्के आहे तर चायना चे साखर उत्पादन जगाच्या तुलनेत ५.४३ टक्के आहे़ हे प्रमुख देश सोडून इतर देश् मिळून ४२ टक्के साखर उत्पादन करतात.