प्रश्न विचारणारेच देशप्रेमी, उत्तरे न देणारे देशद्रोही! - तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 04:48 PM2018-04-08T16:48:57+5:302018-04-08T16:48:57+5:30

मार्क्स, गांधी, आंबेडकर यांच्या तत्वज्ञानावर व्याख्याने देऊन आता काही साध्य होणार नाही तर सरकारला आव्हान देण्यासाठी लढा उभारावा लागेल, असे तुषार गांधी म्हणाले.

Tushar Gandhi: DeshGujarat who did not answer the questions, Deshpremi, who asked questions | प्रश्न विचारणारेच देशप्रेमी, उत्तरे न देणारे देशद्रोही! - तुषार गांधी

प्रश्न विचारणारेच देशप्रेमी, उत्तरे न देणारे देशद्रोही! - तुषार गांधी

Next
ठळक मुद्दे तीसरे मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलननाशिक - मुंबई अशी पायपीट करत सत्ताधा-यांच्या द्वारावर मोर्चाने धडकला, हा पुरावा पुरेसा आंबेडकर व गांधी यांनी एकमेकांना कधीही आपले शत्रू मानले नाही.

नाशिक : देशाला आज पुन्हा क्रांतीची गरज वाटत आहे. राष्ट्रउभारणीसाठी आवश्यक असलेल्या विचारांचा संगम आज पूर्णत: भ्रष्ट झालेला दिसून येतो. असे होणे अत्यंत गंभीर व राष्टहिताच्यादृष्टीने चिंतेची बाब आहे. राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना देशाची काळजी असते, त्यामुळे ते देशप्रेमीच आहे; मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरे न देणारे लोक देशद्रोही वाटतात, असे परखड मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
विचार जागर मंच व कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने तीसरे मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गांधी संमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार व साहित्यीक उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे, श्रीपाद जोशी, डॉ. गोपाळ गुरू उपस्थित होते. यावेळी गांधी यांनी मूलतत्ववादी विचारधारेवर जोरदारी टीका करत आंबेडकर-महात्मा गांधी यांच्याविषयी गैरसमज पसरविणा-यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्येही वैचारिक मतभेद असतील मात्र त्यांनी कधीही एकमेकांचा द्वेष केला नाही. गांधीजींच्या खूनाच्या खटल्याप्रसंगी आंबेकर कायदेमंत्रीपदावर असतानाही ते सुनावणीच्या वेळी जातीने उपस्थित राहत होते. त्यामुळे आंबेडकर व गांधी यांनी एकमेकांना कधीही आपले शत्रू मानले नाही. या दोघांना मानणा-या वर्गापैकी काही भक्तांनी आपली तर्कबुध्दी गहाण ठेवून गांधी-आंबेडकरांमध्ये शत्रुत्व निर्माण करुन त्यांच्यावर अन्याय केला. पुणे करारावर बाबासाहेबांनी गांधीजींच्या हट्पोटी स्वाक्षरी केली असे म्हणणे चुकीचे आहे. कारण त्यांनी स्वाक्षरीराष्ट्रप्रेम व देशभक्तीमधून केली होती. त्यावेळी इंग्रज राजकिय विभागणी करण्याचा डाव आखत होते, याची जाणीव बाबासाहेबांना होती, असे तुषार गांधी यांनी यावेळी सांगितले.


‘चंपारण्य-खेडा’नंतरही शेतक-यांच्या समस्या ज्वलंत
चंपारण्य  व खेडा सत्याग्रह १९१८साली बापूंनी केला मात्र त्यानंतरही शेतक-यांचे प्रश्न आजही तितकेच ज्वलंत वाटत आहे. न्याय मागण्यांसाठी शेतकरी नाशिक - मुंबई अशी पायपीट करत सत्ताधा-यांच्या द्वारावर मोर्चाने धडकला, हा पुरावा पुरेसा आहे शेतक-यांच्या व्यथा सांगण्यासाठी. आजही या सरकारच्या काळात मजूर, कष्टकरी कामगार, शेतकरी, दलीत असे सर्वच घटक असुरक्षित झाले आहे. मार्क्स, गांधी, आंबेडकर यांच्या तत्वज्ञानावर व्याख्याने देऊन आता काही साध्य होणार नाही तर सरकारला आव्हान देण्यासाठी लढा उभारावा लागेल, असे तुषार गांधी म्हणाले.

Web Title: Tushar Gandhi: DeshGujarat who did not answer the questions, Deshpremi, who asked questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.