ट्विट केलं सोनू निगमनं, मनस्ताप मात्र सोनू सूदला

By admin | Published: April 17, 2017 07:01 PM2017-04-17T19:01:24+5:302017-04-17T19:13:33+5:30

सोशल मीडिया कोणासाठीही व्यक्त होण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे.

Tweeted Sonu Nigmanan, Manastap only Sonu Soodla | ट्विट केलं सोनू निगमनं, मनस्ताप मात्र सोनू सूदला

ट्विट केलं सोनू निगमनं, मनस्ताप मात्र सोनू सूदला

Next
ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17 - सोशल मीडिया कोणासाठीही व्यक्त होण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. कलाकारापासून ते राजकारण्यांपर्यंत समाजात घडणा-या निरनिराळ्या घटनांवर सोशल मीडियातील ट्विटर, फेसबुक सारख्या माध्यमांतून ब-याचदा प्रतिक्रिया उमटत असतात. मात्र याच सोशल मीडियावर कधी काय होईल हेसुद्धा सांगता येत नाही. ब-याचदा एकानं केलेल्या ट्विटचा दुस-यालाच मनस्ताप सहन करावा लागतो. असाच काहीसा प्रकार सोनू सूदसोबत झाला आहे.

सोनू निगमनं सकाळीच सकाळी ट्विट करत मशिदींवरील भोंग्याद्वारे होणा-या अजानवर आक्षेप नोंदवला होता. "मी मुस्लिम नाही, तरीही सकाळी मला अजानमुळे उठावं लागतं. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबवणार? ", असा प्रश्न सोनू निगमनं ट्विटरद्वारे उपस्थित केला होता. त्यानंतर युजर्स सोनू हे नाव वाचून सोनू निगमच्या ऐवजी सोनू सूदला ट्रोल करू लागले. सोनू सूदही ट्विट करत म्हणाला, मी अजूनपर्यंत आश्चर्यचकीत आहे. काय झालं आहे ?, कोण बोललं ?,  मला काय झालं आहे ते विचारत आहेत.
 
तत्पूर्वी स्नॅपचॅटच्या सीईओंनीही असंच वादग्रस्त ट्विट केलं होतं. आमचे अॅप गरीब भारतीयांसाठी नाही, असे सांगून भारतीयांची खिल्ली उडवणाऱ्या स्नॅपचॅटला त्यावेळी भारतीयांनी धडा शिकवला होता. स्नॅपचॅटचे सीईओ इव्हान स्पीगल यांनी भारतीयांबाबत आक्षेपार्ह उद्गार काढल्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी ट्विटर आणि फेसबूकवर #boycottsnapchat  आणि #Uninstallsapchat हे हॅशटॅग ट्रेंड करत होते. त्यानंतर लोकांनी स्नॅपचॅटऐवजी स्नॅपडीलचं अॅप डिलीट केलं होतं. 
 

Web Title: Tweeted Sonu Nigmanan, Manastap only Sonu Soodla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.