कालव्यात आढळला बारा फुटांचा अजगर
By admin | Published: November 16, 2016 07:43 PM2016-11-16T19:43:27+5:302016-11-16T19:54:42+5:30
येथे कालव्याची स्वच्छता करताना पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना दाट गवतात बारा फुट लांबीचा अजगर आढळला.
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १६ : रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना कालव्यातून पाणी द्यावे लागणार आहे. त्यासाठी अन्वी मिर्झापूर येथे कालव्याची स्वच्छता करताना पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना दाट गवतात बारा फुट लांबीचा अजगर आढळला. सर्पमित्रांच्या साहाय्याने त्याला काटेपूर्णा अभयारण्यात सोडण्यात आले.
महान धरणात पुरेसा जलसाठा आहे. त्यामुळे तीन वर्षांनंतर प्रथमच धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळणार आहे. पिकांना पाणी सोडण्यापूर्वी पाटबंधारे विभागाकडून कालव्याची स्वच्छता केली जात आहे. बुधवारी गवत कापणे सुरू असताना बारा फुटांचा अजगर त्यात दडून असल्याचे मजूर विकी वानखडे, दीपक लहाळे, इकबाल देशमुख यांना दिसला. त्यांनी सर्पमित्र प्रशांत नागे यांना बोलाविले. त्यांनी अजगराला शिताफीने पकडले. वन विभागाचे क्षेत्रीय सहायक पी. बी. गीते यांच्याकडे तो अजगर देण्यात आला. त्याला अभयारण्यात सोडण्यात आले. यावेळी राजकिरण बागडे, संदीप लहाळे, राजेश खांडेकर, नीलेश वानखेडे, सिद्धुदंत बामर्डे, पंकज नवलकार, ऋषिकेश भुस्कुटे, आकाश मालपाणई व मोहन गुडदे यांनी सहकार्य केले.