पोलीस निरीक्षकांसह बाराजण निलंबित

By Admin | Published: June 20, 2016 05:14 AM2016-06-20T05:14:52+5:302016-06-20T05:14:52+5:30

पोलिसांच्या ताब्यातील संशयिताचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह बाराजणांना तडकाफडकी निलंबित केले आहे

Twelve people including the police inspector suspended | पोलीस निरीक्षकांसह बाराजण निलंबित

पोलीस निरीक्षकांसह बाराजण निलंबित

googlenewsNext

कऱ्हाड : पोलिसांच्या ताब्यातील संशयिताचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह बाराजणांना तडकाफडकी निलंबित केले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण केली नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. एका खासगी बसमधून ७७ लाख रुपये किमतीचे अडीच किलो सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना नुकतीच घडली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास धस या प्रकरणाचे तपासी अधिकारी होते. रावसाहेब जाधवसह अनिल डिकोळे (३६) यांना पोलिसांनी
संशयावरून ताब्यात घेतले. रावसाहेब जाधव याच्यावर यापूर्वी आंध्रप्रदेश पोलिसांत देखील गुन्हा दाखल आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Twelve people including the police inspector suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.