ब बदकाचा.... बारा टक्के जीएसटीचा! आता पूर्व प्राथमिक शिक्षणही कराच्या कक्षेत

By संतोष भिसे | Published: July 23, 2022 07:56 AM2022-07-23T07:56:31+5:302022-07-23T07:56:48+5:30

तुमच्या जेवणाच्या ताटापर्यंत कर लागू करणाऱ्या केंद्र सरकारने  शालेय पुस्तकांवरही जीएसटी लागू केला.

twelve percent gst now pre primary education is also under the ambit of tax | ब बदकाचा.... बारा टक्के जीएसटीचा! आता पूर्व प्राथमिक शिक्षणही कराच्या कक्षेत

ब बदकाचा.... बारा टक्के जीएसटीचा! आता पूर्व प्राथमिक शिक्षणही कराच्या कक्षेत

googlenewsNext

संतोष भिसे, लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : तुमच्या जेवणाच्या ताटापर्यंत कर लागू करणाऱ्या केंद्र सरकारने  शालेय पुस्तकांवरही जीएसटी लागू केला. त्याची अंलबजावणी १८ जुलैपासून सुरू झाली. नव्याने येणारे शैक्षणिक साहित्य १२% जीएसटीसह येणार आहे. त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणही कराच्या कक्षेत आले आहे. मुलांना ‘ब बदकाचा’ धडे देणाऱ्या पालकांनाही १२% जीएसटी ध्यानात ठेवावा लागेल. क्रमिक पुस्तकांवर प्रथमच कर आकारणी होत आहे. सरासरी ३० रुपयांचा नकाशा व तक्त्यासाठी आता चार रुपये जीएसटी द्यावा लागेल.

अंकलिपी, नकाशाचे तक्तेही महागणार

- पाच रुपयांची अंकलिपी सहा रुपयांना मिळेल. नकाशाचे तक्तेही महागणार आहेत. 

- बाजारात सध्या उपलब्ध असणारी पुस्तके जुन्या दरानेच विकली जात आहेत, पण उत्पादकांकडून नव्याने येणारा माल १२ टक्के जीएसटी आकारणीसह येईल असे विक्रेत्यांनी सांगितले. 

- जीएसटी परिषदेने अन्य शैक्षणिक पुस्तकांसाठी किंवा साहित्यविषयक प्रकाशनांसाठी करआकारणी अद्याप केलेली नाही.

कशावर जीएसटी?

अंकगणिताची पुस्तके, मराठी व इंग्रजी बाराखडीची पुस्तके, अंकलिपी, नकाशे, चित्रपुस्तिका, शिक्षणविषयक चित्रांची कॅलेंडर्स आदी पूर्व प्राथमिक शैक्षणिक साहित्यावर १२ टक्के जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंत ते करमुक्त होते.

सध्या बाजारात उपलब्ध असणारा साठा जुन्या दरानुसारच आहे. पण नव्याने येणारे साहित्य १२% जीएसटीसह येईल. - राहुल ताम्हणकर, पुस्तक विक्रेता

किमतीत काय बदल?

साहित्य     जुनी    नवी 
नकाशा पुस्तिका    १४०    १५७ 
नकाशा वही    ८०    ९७
लहान चित्रतक्ता    ३०    ३४
मोठा चित्रतक्ता    १८०    २०२
नकाशा पॅकेट    १००    ११२
कंपास    २००    २१८
१० पेन्सिल बॉक्स    ७०    ८८

Web Title: twelve percent gst now pre primary education is also under the ambit of tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.