बारा हजार पालक ‘दत्तक’ मुलांच्या प्रतीक्षेत

By admin | Published: July 19, 2015 10:56 PM2015-07-19T22:56:37+5:302015-07-19T22:56:37+5:30

प्रक्रिया आॅनलाईन : समाजाचा वाढता प्रतिसाद; देशभरातील संस्थांमध्ये सुमारे सहा हजार बालके

Twelve thousand parents are waiting for their 'adoptive' children | बारा हजार पालक ‘दत्तक’ मुलांच्या प्रतीक्षेत

बारा हजार पालक ‘दत्तक’ मुलांच्या प्रतीक्षेत

Next

विश्वास पाटील - कोल्हापूर -मुले दत्तक देण्याच्या प्रक्रियेतील गैरव्यवहार रोखून ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी केंद्र सरकारने ही प्रक्रिया आता आॅनलाईन केली आहे. सद्य:स्थितीत दत्तक देता येण्याजोगी देशभरातील संस्थांमध्ये सुमारे सहा हजार बालके असताना मूल दत्तक हव्या असलेल्या बारा हजारांहून जास्त पालकांची प्रतीक्षा यादी आहे. त्यामुळे ‘कुणी बाळ देता, का बाळ’ अशीच काहीशी पालकांची अवस्था बनली आहे.
आतापर्यंत ही सर्व प्रक्रिया कागदोपत्री होती. त्यामुळे मुले दत्तक देण्यास विलंब होत होताच शिवाय त्यावर नियंत्रण ठेवणेही अवघड होते. आता दत्तक देण्यासाठी किती मुले उपलब्ध आहेत, त्यांची छायाचित्रे व त्यांच्याबद्दलची सगळी इत्थंभूत माहिती पालकांना आॅनलाईन
उपलब्ध होणार आहे. जे पालक बाळ दत्तक घेऊ इच्छितात त्यांचीही
माहिती यामुळे सर्व संस्थांना मिळणार आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटी (कारा) ही संस्था ही प्रक्रिया
नियंत्रित करते. या प्रक्रियेमुळे देशभरातील सर्व दत्तक देण्यात येणाऱ्या मुलांची आमि इच्छुक पालकांचीही माहिती ‘कारा’कडे उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्रात देशाबाहेर मुले
दत्तक देण्याची परवानगी असलेल्या (रिपा संस्था) २१ आणि देशातच
दत्तक देणाऱ्या ४५ संस्था आहेत. आताच्या पद्धतीनुसार दत्तक देण्यासाठीचे मूल त्या संस्थेत कधी आले व ते कधी दत्तक दिले गेले, हा ट्रॅक तपासणे शक्य होत नव्हते. आता मूल बाल न्याय समितीकडून अ‍ॅडॉप्शनसाठी मुक्त होताच दोन महिन्यांच्या आत ते दत्तक देणे बंधनकारक असेल. आतापर्यंत दोन पालकांचा नकार आल्यावर त्या
मुलास परदेशात दत्तक दिले जात होते. अशा व्यवहारात काही संस्थांकडून पैशांची लूटमार होत असे. हे शासनाच्या लक्षात आल्याने ८० टक्के मुले ही भारतातच दत्तक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांना मूल दत्तक घ्यायचे आहे, त्यांच्याकडे पॅनकार्ड आणि स्वत:चा मेल आयडीही हवा.
पालकांनी मूल पसंत केल्यानंतर महिन्याच्या आत गृहभेट करणे बंधनकारक केले आहे. केंद्र सरकारने
हे काम सोपे व्हावे यासाठी
प्रत्येक राज्यांसाठी स्वतंत्र समन्वयक अधिकारी नियुक्त केला आहे. पूर्वी या कोणत्याच प्रक्रियेचा कालावधी निश्चित नव्हता. त्यामुळे सगळी प्रक्रियाच वेळखाऊ होती. नव्या पद्धतीमुळे त्यात सुलभता आली असून दत्तक चळवळीला त्यामुळे अधिक गती येऊ शकेल, असे या क्षेत्रांतील जाणकारांचे म्हणणे आहे.

मुला-मुलींना दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला चळवळीचे स्वरूप आले असून ती प्रवाही होत आहे. समाजातील चांगल्या बदलाचे हे लक्षण आहे. त्या संदर्भातील कायद्यातील बदल हेही या मुला-मुलींचे भवितव्य योग्यरितीने घडावे यादृष्टीने करण्यात आले आहेत.
- डॉ. प्रमिला जरग
पदसिद्ध अध्यक्ष,
अनाथालये व इतर धर्मादायगृहे अधिनियमांतर्गत स्थापन नियंत्रण मंडळ

म्
राज्यात हजारावर दत्तकविधान
महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे १५०० मुले उपलब्ध असतात. त्यातील ११०० ते १२०० मुले दत्तक दिली जातात. मुलांची मागणी अडीच हजाराच्या आसपास असते. या नोंदी ठेवणारा स्वतंत्र कक्ष पुण्यात आहे.

Web Title: Twelve thousand parents are waiting for their 'adoptive' children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.