बारावी इंग्रजीचा पेपर फुटला

By admin | Published: February 28, 2017 07:10 PM2017-02-28T19:10:11+5:302017-02-28T19:10:11+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणा-या १२ वीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ झाला

Twelveth English paper split | बारावी इंग्रजीचा पेपर फुटला

बारावी इंग्रजीचा पेपर फुटला

Next
ऑनलाइन लोकमत
खामगाव (बुलडाणा), दि. 28 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणा-या १२ वीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशीचा इंग्रजीचा पेपर फुटला. या पेपरला ११ वाजता सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही मिनीटात म्हणजे ११.०४ वाजता हा पेरपर व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल झाला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मंगळवारपासून इयत्ता १२ वीच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. आज पहिल्या दिवशी इंग्रजीचा पेपर होता. दरम्यान ११ वाजून ४ मिनीटांनी घेण्यात येणा-या इंग्रजी पेपरची प्रश्नपत्रिका काही व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाली. विशेष म्हणजे गत काही वर्षांपासून बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्या यासाठी मोठ्या प्रमाणात दक्षता घेतली जात आहे. यासाठी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना कॉपीमुक्तीची शपथ दिली जाते. तसेच काही परीक्षा केंद्रावर कॅमेरे लावले आहेत. सोबतच कडक पोलीस बंदोबस्त सुध्दा असतो. याचबरोबर, भरारी पथकांची सुध्दा नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना मोबाईल परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई असताना पेपर कसा फुटला याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. तेव्हा या प्रकाराची चौकशीची गरज व्यक्त केल्या जात आहे. 

 

Web Title: Twelveth English paper split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.