युतीमुळेच भाजपचे पंचवीस वर्षे झाले नुकसान

By admin | Published: April 29, 2015 10:13 PM2015-04-29T22:13:59+5:302015-04-30T00:29:39+5:30

बाळ माने : राजकारणातील पोकळी भरून काढण्यास भाजपला अपयश आल्याची कबुली

Twenty-five years of BJP's loss due to coalition | युतीमुळेच भाजपचे पंचवीस वर्षे झाले नुकसान

युतीमुळेच भाजपचे पंचवीस वर्षे झाले नुकसान

Next

मंडणगड : पंचवीस वर्षांच्या युतीच्या राजकारणात भाजपचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे राजकारणात पोकळी निर्माण होऊन ती भरुन काढण्यास पार्टीस अपयश आले त्याचा फटका सर्वच निवडणुकात सोसावा लागला आहे, अशी कबुली प्रतिपादन भाजपा प्रदश प्रवक्ते बाळ माने यांनी मंडणगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भाजपा सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचा दौरा करणाऱ्या माने यांनी विविध प्रश्नावर पत्रकारांशी संवाद साधला. यात आगामी काळात जिल्ह्यात शत-प्रतिशत भाजपा-जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्वबळावरील निवडणुका हा पक्षासमोर अतिशय महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणुकांमध्ये पक्षाचे अस्तित्त्व दाखवून देण्यासाठी कार्यकर्ते कामास लागले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवेचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे वास्तवात आणण्यासाठी हे गाव दत्तक पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या आदर्श ग्राम विकास योजनेच्या घोषणेअंतर्गत खासदार अमर सांबळे यांनी दत्तक घेतले असल्याचे त्यांनी सांगीतले.
जिल्ह्यात एक लाख सदस्य नोंदणी व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मिशन थर्टीप्लस या दोन विषयांवर भाजपने जिल्ह्यात आपले लक्ष केंदी्रत केले आहे, असे ते म्हणाले. कोकणातील पक्षाची व्याप्ती लक्षात घेता अगदी ग्रामपंचायत स्तरापासून पक्षाचे काम वाढेल, यावर लक्ष देण्यात आले असून नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शक्य आहे तेथे उमेदवार उभे करण्यात आले. देवगड, गुहागर व रत्नागिरी मतदारसंघांपुरती पक्षाची ओळख मर्यादित न ठेवता सर्वच ठिकाणी वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. २०१७ जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती गण बांधण्याचे काम सुरु आहे. तालुक्यात पक्ष बांधणीसाठी प्रयत्न सुरू असून येथे लघु उद्योगांची निर्मिती करुन पर्यटन मत्सव्यवसायाचे माध्यमातून रोजगार निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत, असे माने यांनी यावेळी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन थोरे, उपाध्यक्ष राजेश नगरकर, युवा आघाडी तालुकाध्यक्ष गिरीष जोशी आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Twenty-five years of BJP's loss due to coalition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.