चोवीस महाविद्यालयांची विद्यापीठाकडून संलग्नता रद्द
By admin | Published: March 13, 2016 01:58 AM2016-03-13T01:58:34+5:302016-03-13T01:58:34+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यापीठाच्या संलग्निकरणासाठी ५५ नवीन महाविद्यालयांचे तर ३२ नवीन संशोधन संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यापीठाच्या संलग्निकरणासाठी ५५ नवीन महाविद्यालयांचे तर ३२ नवीन संशोधन संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तर २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून एकूण २४ महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्यात आली आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी अधिसभेतील भाषणात सांगितले.
विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयांचे आॅडीट करण्यात आले. त्यात काही महाविद्यालयांकडे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथालयाची सुविधा व इतर पायाभूत सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यापीठाने २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून एकूण २४ महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. गाडे म्हणाले, विद्यापीठात अत्याधुनिक ई- कंटेंट स्टुडिओ उभारण्या आला असून स्टुडिओच्या माध्यमातून विविध विषयावरील ई- लेक्चर तयार केले जात आहेत. गंभीर विषय सोप्या पध्दतीने समजून देण्यासाठी सर्व विद्याशाखांच्या प्राध्यापकांना या स्टुडिओचा वापर करता येणार येईल. विद्यापीठातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना या स्टुडिओचा वापर करून न्यूज चॅनेलवरील कामाचे प्रशिक्षण देता येणार आहे. परिणामी पुढील काळात विद्यापीठाला स्वत:चे आॅनलाईन न्यूज चॅनेल चालविणेही शक्य होणार आहे. विद्यापीठाने यापूर्वीच केंद्र शासनाला न्यूज चॅनेल सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे.
विद्यापीठाच्या ६८५ कोटींच्या
अर्थसंकल्पास मंजुरी -वृत्त/३