बारामतीत दोन तास मुसळधार पाऊस
By admin | Published: July 1, 2014 02:36 AM2014-07-01T02:36:29+5:302014-07-01T02:36:29+5:30
सोमवारी पावसाने बारामती तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार हजेरी लावली. अवघ्या दोन तासांत या भागातील तळे, नाले, बंधारे दुथडी भरून वाहू लागले.
>बारामती/ उंडवडी : राज्यभरात पावसाने ओढ दिलेली असताना सोमवारी पावसाने बारामती तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार हजेरी लावली. अवघ्या दोन तासांत या भागातील तळे, नाले, बंधारे दुथडी भरून वाहू लागले.
सोमवारी अचानक हवामानबदल होऊन दुपारी चारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या दीड तासात परिसरातील तलाव, चा:या, बंधारे, नाले दुथडी भरून वाहू लागले. मुसळधार पावसाबरोबर जोरदार वा:यामुळे काही ठिकाणी रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
कडक्याच्या उन्हाने होरपळून निघालेल्या बारामती तालुक्यातील पश्चिम भागात पडलेल्या पावसामुळे वातावरण अल्हाददायक झाले. हवेत गारवा निर्माण झाला. पावसामुळे भागातील शेतक:यांनी समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)
तळ्याचे स्वरूप
दोन तास ढगफुटीप्रमाणो झोडपून काढलेल्या पावसामुळे शेतजमिनींना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.