सहा मनपात दुप्पट टीडीआर
By admin | Published: January 30, 2016 04:18 AM2016-01-30T04:18:54+5:302016-01-30T04:18:54+5:30
राज्यातील १८ महापालिकामध्ये विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) दुप्पट करण्याचा निर्णय गुरुवारी घेतल्यानंतर आज ठाण्यासह ठाणे जिल्ह्णातील सहा महापालिकांमध्येही हा नियम लागू करण्याचा
मुंबई : राज्यातील १८ महापालिकामध्ये विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) दुप्पट करण्याचा निर्णय गुरुवारी घेतल्यानंतर आज ठाण्यासह ठाणे जिल्ह्णातील सहा महापालिकांमध्येही हा नियम लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. मुंबई महापालिका क्षेत्रासाठी हा आदेश येत्या आठ दिवसात काढण्यात येणार आहे.
१८ महापालिकांमध्ये टीडीआर धोरण गुरुवारी जाहीर करण्यात आले. लोकमतने सर्वप्रथम हे वृत्त दिले. पाठोपाठ आज ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर आणि मिरा भार्इंदर महापालिकांत टीडीआरमध्ये वाढ करण्याची अधिसूचना नगरविकास विभागाचे अवर सचिव संजय सावजी यांनी काढली. (विशेष प्रतिनिधी)
दाट वस्तीत तिप्पट टीडीआर
१८ महापालिकांबाबत लागू केलेले टीडीआरचे धोरण या सहा महापालिकांसाठीही लागू करण्यात आले आहे. नवी मुंबईमध्ये टीडीआर लागू नाही.
सरकार वा स्थानिक स्वराज्य संस्थेने संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात बांधकामासाठी वाढीव एफएसआय टीडीआर स्वरुपात दिला जातो. दाट वस्तीच्या ठिकाणी तो तिप्पट तर विरळ वस्तीच्या ठिकाणी दुप्पट दिला जाणार आहे.
१८ महापालिकांबरोबरच ठाणे जिल्ह्णातील महापालिकांसाठीही टीडीआर धोरण जाहीर करावे, असे आधी ठरले होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे आज या बाबतचा आदेश निघाला.