नक्षली हल्ल्यात वीस वर्षात १२ हजारांवर लोक ठार
By admin | Published: July 19, 2016 06:22 PM2016-07-19T18:22:01+5:302016-07-19T18:22:01+5:30
पश्चिम बंगालमधील नक्षलबारीमध्ये जन्मलेल्या नक्षलवादाच्या राक्षसाने भारतात मोठ्या प्रमाणावर भय आणि अस्थिरता पसरवली आहे. बिहारमधील नक्षलवाद्यांबरोबरची
Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.19 - पश्चिम बंगालमधील नक्षलबारीमध्ये जन्मलेल्या नक्षलवादाच्या राक्षसाने भारतात मोठ्या प्रमाणावर भय आणि अस्थिरता पसरवली आहे. बिहारमधील नक्षलवाद्यांबरोबरची सुरक्षा दलांची चकमक आणि नक्षलवाद्यांनी पेलेल्या भूसुरंगाच्या स्फोटात सोमवारी १० जवान ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांनी गेल्या वीस वर्षात देशातील १२ हजारांवर लोकांचा जीव घेतलेला आहे. यामध्ये २७१२ जवान शहीद झाले आहेत.
आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र ही नक्षल प्रभावित राज्ये आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सन २०१५ पर्यंत नक्षली हल्ला किंवा त्यांच्याबरोबर झालेल्या चकमकीत ९४७१ नागरिक मृत्यूमुखी पडले; तर २७१२ केंद्रीय आणि राज्य सरकारचे जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगढमध्ये महेंद्र कर्मा यांनी ‘सलवा जुडम’ मोहीम राबवून नक्षलवाद्यांचा खातमा करण्याची योजना राबविली होती. त्याची किंमत २५ मे २००१३ मधील एका हल्ल्यात काँग्रेसला चुकवावी लागली. यामध्ये कर्मा यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पटेल त्यांचा मुलगा दिनेश आणि अन्य २५ जण मृत्यूमुखी पडले. याच हल्ल्यात जखमी झालेले ज्येष्ठ काँग्रेस नेते विद्याचरण शुक्ल यांचेही नंतर निधन झाले.
नक्षलप्रभावित नऊ राज्यांमध्ये नक्षली हल्ल्यात आजवर झालेले मृत्यू असे, सन १९९३ -४६८, १९९४ - ३७६, १९९५ - ३९६,१९९६ -४५४,१९९७ -५८३,१९९८ -४८९,१९९९ -५९५,२००० -५४८,२००१ -५६४,२००२ -४८१,२००३ -५१५,२००४ -५६५,२००५ -५६९,२००६ -६७८,२००७ -६९१,२००८ -७१७,२००९ -९०८,२०१० -१००५,२०११ -६०८,२०१२ -४१५,२०१३ ते २०१५ -४२२ हून अधिक.