दिव्यांग पिडीतेवर अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
By अनिल गवई | Published: March 2, 2023 05:31 PM2023-03-02T17:31:00+5:302023-03-02T17:31:14+5:30
गतीमंद असलेल्या दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या दोन नराधमांना वीस वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
खामगाव:
गतीमंद असलेल्या दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या दोन नराधमांना वीस वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच प्रत्येक आरोपीला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. खामगाव जिल्हा सत्र न्यायाधीश तथा सहा. सत्र न्यायाधीश पी.एस.काळे यांनी हा महत्वपूर्ण निकाल बुधवारी दिला.
खामगाव शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या एका भागात १० िडसेंबर २०१९ रोजीच्या रात्री चॉकलेटचे आमिष देत एका गतीमंद अल्पवयीन मुलीला ओसाड जागेवर नेण्यात आले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ज्ञानेश्वर किसन तायडे (२७) आणि दत्ता श्रीराम साठे (३६) यांच्या विरोधात शिवाजी नगर पोलीसांनी भादंवि ३७६ डी, ३७६ (२) तसेच दिव्यांग सुरक्षा नुसार तर पाँस्को कायदा सेक्शन ६ अंतर्गत ११, िडसेंबर २०१९ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरक्षक रविंद्र देशमुख यांनी दोन्ही आरोपींना अटक केली. याप्रकरणी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. आरोपीविरोधात सबळ पुरावे आढळून आल्याने न्यायालयाने दोन्ही आरोपींना वीस वर्ष सश्रम कारावासाची शीक्षा सुनावली. तसेच प्रत्येक आरोपीला प्रत्येकी १५ हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. तपासी अधिकारीमम्हणून राहुल जगदाळे, पैरवी अधिकारी म्हणून राजेश ठाकूर यांनी काम पाहीले. सरकार पक्षाची बाजू विशेष सरकारी वकील प्रशांत लाहुडकार यांनी मांडली.