'त्या’ चिमुकलीवर दोन वेळा अत्याचार
By admin | Published: August 23, 2016 10:13 PM2016-08-23T22:13:16+5:302016-08-23T22:13:16+5:30
शाळेतील आठवर्षीय चिमुकलीशी अहेमद खान अमीन खान या नराधम शिक्षकाने अश्लील चाळेच नव्हे, तर दोन वेळा अत्याचार केल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 - शाळेतील आठवर्षीय चिमुकलीशी अहेमद खान अमीन खान या नराधम शिक्षकाने अश्लील चाळेच नव्हे, तर दोन वेळा अत्याचार केल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले आहे. जिन्सी पोलिसांनी या शिक्षकाविरुद्ध मंगळवारी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. विशेष न्यायाधीश एस.एस. नायर यांनी या शिक्षकास २९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आझाद चौकात राहणारी आठवर्षीय मुलगी नागसेन कॉलनीतील सुप्रीम ग्लोबल स्कूलमध्ये शिकते. शाळेतील शिक्षक अहेमद खान (३७, रा. हर्षनगर, मंजूरपुरा) याने चिमुकलीवर दोन वेळा अत्याचार केला होता. ‘अत्याचाराची
वाच्यता केल्यास आई- वडिलांना ठार मारीन,’अशी धमकी त्याने मुलीस दिली होती. या घटनेमुळे भेदरलेली मुलगी आजारी पडली होती. आजी व आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, शाळेत छळ होत असल्याचे सांगितले. यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सोमवारी दुपारी मुलीला घेऊन शाळा गाठली. अहेमद खान याच्याकडे बोट दाखवून त्यानेच आपल्यावर अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी अहेमद खान यास
बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी पीडित मुलीच्या आजीने जिन्सी पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती. सोमवारी रात्री उशिरा मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर दोन वेळा जबरी अत्याचार केल्याचे समोर आले. महिला पोलीस अधिकाºयांनी मुलीचा जबाब नोंदवला. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात बदल करून बलात्कार केल्याचे कलम लावले.
अहेमद खान यास विशेष न्यायाधीश नायर यांच्यासमोर हजर केले असता, त्यांनी २९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
नातेवाईक आयुक्तांना भेटले...
पीडित मुलीच्या नातेवाईकांनी मंगळवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. शिक्षक अहेमद खान याला कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली.