भररस्त्यात हस्तमैथून करणाऱ्याला पकडण्यासाठी तरुणींनी घेतली टविटरची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2016 06:42 PM2016-07-19T18:42:45+5:302016-07-20T12:58:54+5:30
त्या मुली सोळा नंबर रोडवर सिग्नंल लागल्यामुळे रिक्षात बसल्या असता एक व्यक्ति त्यांच्या बाजूला आला आणि त्यांच्याकडे पाहून त्याने अश्लिल चाळे करण्यास सुरवात केली.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ : मुंबईमध्ये काही दिवसापुर्वी एक घृणास्पद गोष्ट घडली. एका तरुणानं मोटरसायकल चालवता चालवता रिक्षात बसलेल्या तरुणीना खुणावत हस्तमैथुन केले. एका तरुणीने तात्काळ ही घटना ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना कळवली. पोलीसांनीही लगेच दखल घेतली आणि त्यांच्या स्मार्ट कामगिरीमुळे भररस्त्यात अश्लिल चाळे करणाऱ्याला ३ तासातं पकडण्यात यश आले. ट्विटरवर दाखलं झालेल्या मुबंई पोलिसांनी त्या तरुणींच्या एका ट्विटच्या आधारे ही कामगिरी पार पाडली.
खार पश्चिम मध्ये २ महाविद्यालयीन तरुणींना पाहून मोटरसायकलवरील रोडरोमीओने चक्क हस्तमैथून करण्यास सुरवात केली. त्या मुली सोळा नंबर रोडवर सिग्नल लागल्यामुळे रिक्षात बसल्या असता एक व्यक्ति त्यांच्या बाजूला आला आणि त्यांच्याकडे पाहून त्याने अश्लिल चाळे करण्यास सुरवात केली. त्यांच्यासमोर त्याने हस्तमैथुन करण्यास सुरवात केली. या प्रकारामुळे त्या मुली भांबावल्या. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत त्या व्यक्तिचा फोटो काढला, त्याचबरोबर मोटारसायकलचा क्रमांकही घेतला. त्यांनतर तो फोटो आपल्या मैत्रिणींना पाठवला व घडलेला प्रकार कथित केला. त्यापैकी एका मुलीने तो फोटो ट्विटरवर मुंबई पोलिसांना (@MumbaiPolice) टॅग करुन पोस्ट केला. फोटोमधील व्यक्ति माझ्या मैत्रिणीकडे पाहून अश्लिल चाळे करत होता. काहीतरी अॅक्शन घ्या अशा प्रकराचे ट्विट केले. यानंतर लगेच मुंबई पोलिसांनी आपल्या कांउटवरुन त्याचा फॉलोअप घेतला.
मुंबई पोलिसांनी त्या मुलीला ट्विटरवर फॉलो करत तिला मॅसेज पाठवला 'आम्ही तुला फॉलो कलेले आही, घडलेला प्रकर आम्हाला डायरेक्ट मेसेज करून सविस्तरपणे सांग. मुलीने सर्व माहिती पोलिसांना दिल्यानंतर गाडीच्या क्रमांकावरुन पोलिसांनी लगेच कारवाई केली. आरटीओच्या मदतीने पोलीसांनी तपास केला असता, सदर तरूण वांद्रे येथे राहणारा रईस लियाकत कुरेशी असल्याचे आढळले आणि पोलीसांनी भररस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्या रईसला अवघ्या ३ तासात बांद्रा येथे पकडले.