राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले, उद्धव ठाकरे प्रदीर्घ काळ मुख्यमंत्रिपदी राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 10:08 PM2021-11-25T22:08:23+5:302021-11-25T22:09:00+5:30
Maharashtra Politics: मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या प्रकृतीच्या समस्या निर्माण झाल्यापासून अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चांना शिवसेना नेते आणि Mahavikas Aghadi सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या Sanjay Raut यांनी पूर्णविराम दिला आहे.
मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी उलथापालथ घडून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. तेव्हापासून या सरकारचे नेतृत्वा पाच वर्षे उद्धव ठाकरे करतील आणि सरकार पाच वर्षे टिकेल, या सरकारमधील नेते वारंवार सांगत असतात. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीच्या समस्या निर्माण झाल्यापासून अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चांना शिवसेना नेते आणि मविआ सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री बदलणार का, अशी विचारणा झाली असता संजय राऊत म्हणाले की, अशा पुड्या कोण सोडतो मला माहिती नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हाच्या प्रक्रियेमधील मी एक साक्षीदार आहे. तसेच एक क्रियाशील कार्यकर्ताही होतो. कुणाच्या डोक्यात कल्पना नव्हती. तेव्हा निकाल सुरू असताना मी शरद पवारांकडे जाऊन असं होऊ शकतो असं सांगितलं. तेव्हा काय चर्चा झाल्या हे मला माहिती आहे. तेव्हा शरद पवार यांनी राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे पूर्ण वेळ करणार असं स्पष्ट केलं होतं. या सरकारचा कालखंड पाच वर्षांचा आहेत त्याच्या मनात शंका नाही, तसेच कुणीही किती खेचाखेची केली तरी सरकार पडणार नाही.
जास्त आमदार म्हणून २०१९ मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. आता २०२४ मध्ये हेच सूत्र कायम राहणार का, अशी विचारणा झाली असता संजय राऊत यांनी ती शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये एकवेळ अशी आली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जास्त होते. तरीही काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला. आमची कमिटमेंट ही पाच वर्षांची आहे. त्यानंतर निवडणुकीला सामोरं जाऊ. मात्र मी नेहमी सांगतो की शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यामध्ये दीर्घकाळ काम करेल. तसेच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांची टर्म पूर्ण करतील. एवढेच नाही तर ते प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहतील.