अडीच वर्षाच्या मुलाने खेळता- खेळता ठेचला साप!

By admin | Published: September 27, 2016 01:31 PM2016-09-27T13:31:00+5:302016-09-27T14:40:37+5:30

वाशिममधील ग्राम आखतवाडा येथे एका अडीच वर्षांच्या बालकाने खेळता खेळता सापच ठेचल्याची घटना घडली.

Two-and-a-half-year-old son plays - crushed snake playing! | अडीच वर्षाच्या मुलाने खेळता- खेळता ठेचला साप!

अडीच वर्षाच्या मुलाने खेळता- खेळता ठेचला साप!

Next
प्रफुल बाणगावकर, ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड ( वाशिम), दि. २७  -  लहान बालकांना कशाचीच भीती राहत नाही असे म्हणतात पण काही लहान मुुलं तर किडयापासूनही दुर पळतांना दिसतात. साप तर दुरच अशी परीस्थिती असतांना अनेक बालकांना किडे किंवा उभयचर प्राण्यांची माहीतीही नसते. त्यामुळे त्यांच्या सोबत खेळतांनाही अनेक बालके दिसतात. व असाच प्रकार ग्राम आखतवाडा येथे २६ सप्टेंबरजी घडला. तो म्हणजे अडीच वर्षाच्या बालकाने विटाच्या ढिगा-यात चाललेल्या सापाला ओढून चक्क ठेचून मारले.  आखडवाडा येथील विनोद माहुरे यांचा अडीच वर्षाचा लखन हा मुलगा सांयकाळच्या सुमारास अंगणात खेळत असतांना त्याला साप विटाच्या ढिंगामध्ये जातांना दृष्टीस पडला. यावेळी या बालकाने भिंतीतील सापाला ओढत बाहेर काढले. व स्वतांच सापाला ठेचून मारले. हा प्रकार विनोद माहुरे यांच्या पत्नीच्या लक्षात येताच त्या घाबरल्या व एकच हबरडा फोडला. कदाचित आपल्या मुलांला सापाने दंश तर केले नसेल ना या शंकेने त्या आईचे हात पाय विरून गेले. त्यात लखनला विनोद माहुरे यांनी कारंजा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ आनले. यावेळी त्यांनी डाॅक्टरांना सापाची जात माहीती पडावी याकरीता लखनने मारलेला सापही सोबत आनला. लखनला पाहताच डाॅक्टरांनी सर्प अभ्यासक प्रा . राजा गोरे यांना बोलाउन लखनची परीस्थिती जाणून घेतली. प्रा राजा गोरे यांनी लखनच्या डोळयात कसलीही भिती नसल्याचे पाहुन आश्चर्य व्यक्त केले व लखनच्या संपुुर्ण शरीराची पाहणी करून सापाने कुठे चावा तर घेतला नाही ना याची तपासणी केली. व साप कोणत्या जातीचा आहे. हे पाहीले. यावेळी प्रा . गोरे यांनी लखनच्या आई वडीलांना सापाने लखनला कुठे चावा घेतल्याचे आढळत नाही.  साप बिनविषारी असून वुल्फ स्नेक अर्थात कवडया साप असल्याचे सांगताच लखनच्या आईवडीलांनी सुटकेचा श्वास टाकला. आपल्या अजानत्या मुलांने सापाशीस खेळ केला. हा खेळ त्यांच्या जिवार बेतू शकला असता या पुढे मुलांला एकटे सोडणार नाही. असे म्हणत लखनच्या पालकांनी प्रा गोरे यांचे आभार मानले. 
 
 सापासारख्या प्राण्यापासून बालकांना दुर ठेवा -  प्रा राजा गोरे, सर्प अभ्यासक 
सध्या सापाच्या बिळात पावसाचे पाणी घुसल्याने साप बाहेर निघतात. बालकांना सापाविषयी कुठलीही माहीती नसल्याने साप चावल्याचे परीणामही त्याना माहीत नसते. सापाच्या सरपटण्याची पध्दत मुलांना भावते. त्यामुळेच ते सापाकडे आकर्षित होउ शकतात. खेळतांना मुलाकडे लक्ष देउन अंगणात खेळत असतांना आजुबाजूचा परीसर स्वच्छ ठेवा जेणेकरून साप, विंचु  यासारखे जिव जंतू लवकर दुष्टीस पडेल . मुले खेळतांना मोठया मंडळीनी नेहमी मुलासोबत राहाणे गरजेचे आहे.  अनेक वेळा लहान मुलांना सर्पदंश होउनही पालक अंधश्रध्देच्या आहारी जावून घरगृती उपाय करतात. परंतु पालकांनी अश्या वेळी दक्ष राहाणे गरजेचे असून न घाबरता लवकरात लवकर रूग्णालयात घेउन जाणे गरजेचे आहे.

 

Web Title: Two-and-a-half-year-old son plays - crushed snake playing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.