गौरी लंकेश हत्येप्रकरणी राज्यातील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 05:42 AM2018-06-03T05:42:55+5:302018-06-03T05:42:55+5:30

बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणी महाराष्ट्रातील दोघांची नावे समोर आली आहेत. चिंचवड येथील अमोल अरविंद काळे (वय ३८) आणि सिंधुदुर्गमधील अमित डेगवेकर यांना एसआयटीने अटक केली असून दोघेही सनातन संस्थेशी संबंधित आहेत.

 Two arrested in connection with the murder of Gauri Lankesh | गौरी लंकेश हत्येप्रकरणी राज्यातील दोघांना अटक

गौरी लंकेश हत्येप्रकरणी राज्यातील दोघांना अटक

Next

पुणे/सिंधुदुर्ग : बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणी महाराष्ट्रातील दोघांची नावे समोर आली आहेत. चिंचवड येथील अमोल अरविंद काळे (वय ३८) आणि सिंधुदुर्गमधील अमित डेगवेकर यांना एसआयटीने अटक केली असून दोघेही सनातन संस्थेशी संबंधित आहेत.
चिंचवड गावच्या माणिक कॉलनीत मध्ये काळे राहत होता. तो २१ मे रोजी मित्रांसह गोव्याहून कर्नाटकला येत असताना, त्याला अटक झाली. कर्नाटक पोलिसांनी त्याच्या चिंचवडमधील घराची तपासणी केली. तो सनातनचा कार्यकर्ता आहे. पत्नी व मुुलगा असे त्याचे कुटुंब आहे. इंजिनिअरिंग कंपन्यांना सुटे भाग पुरविण्याचा त्याचा व्यवसाय आहे. काळेला दोन दिवससांपूर्वी संशयित आरोपी म्हणून वर्ग केले गेले. त्याच्या डायरी गौरी लंकेश यांच्या नावाचा उल्लेख होता.

अमित डेगवेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळणे गावचा आहे. याठिकाणी आई, वडील
व इतर दोन भाऊ राहतात. तो गेल्या काही वर्षांपासून फोंडा-गोवा येथे स्थायिक झाला होता. केवळ गणेश चतुर्थीचा सण वगळता तो गावी येत नसे. त्याचा गावातील इतरांशीही संबंध नसल्याचे समोर आले आहे.

2009 साली मडगाव-गोवा येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातही त्याची चौकशी झाली होती. त्यानंतर प्रदीप आणि इतर नावानेही त्याचा वावर होता.

Web Title:  Two arrested in connection with the murder of Gauri Lankesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.