घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक
By admin | Published: December 6, 2015 02:38 AM2015-12-06T02:38:11+5:302015-12-06T02:38:11+5:30
कोट्यवधी रुपयांच्या रेशन धान्य घोटाळ््यातील घोरपडे बंधूंचे साथीदार काशीनाथ पाटील व ज्ञानेश्वर घुले यांना वाडीवऱ्हे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली़ या दोघांसह पोलीस
नाशिक : कोट्यवधी रुपयांच्या रेशन धान्य घोटाळ््यातील घोरपडे बंधूंचे साथीदार काशीनाथ पाटील व ज्ञानेश्वर घुले यांना वाडीवऱ्हे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली़ या दोघांसह पोलीस कोठडीची मुदत संपलेल्या लक्ष्मण पटेल याला विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी यांनी १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़
घोटाळ््यातील प्रमुख सूत्रधार अरुण घोरपडे, त्यांची मुलगी पूनम होळकर व जितूभाई ठक्कर हे फरार आहेत़ विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवादात सांगितले की, घोटाळ््यातील संशयित लक्ष्मण पटेल याच्या कंपनीला एका वर्षात १० लाखांचा, तर घोटाळा झाल्याच्या दुसऱ्या वर्षी सव्वा कोटी रुपयांचा नफा झाला़ त्यामुळे एका वर्षात इतका नफा कसा झाला? मूळचा रिक्षाचालक व महालक्ष्मी कार्पोरेशनचा मालक काशीनाथ पाटील याच्या कंपनीतून ६६ लाख रुपये देण्यात आले आहेत़ घोटाळ्यातील संशयित संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, मगन पवार व रमेश पाटणकर यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.