‘‘दोन हाणा, पण मलाच बाजीराव म्हणा’, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था’’, भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 05:56 PM2024-08-17T17:56:11+5:302024-08-17T17:57:25+5:30
Prasad Lad Criticize Uddhav Thackeray: काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आताच घोषित करण्याची मागणी केली. (Maharashtra Assembly Election 2024) मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या मुद्द्याला पद्धतशीरपणे बगल दिली. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर मोठी नाचक्की ओढवली. या मुद्द्यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राज्यातील विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आताच घोषित करण्याची मागणी केली. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या मुद्द्याला पद्धतशीरपणे बगल दिली. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर मोठी नाचक्की ओढवली. या मुद्द्यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
भाजपा नेते प्रसाद लाड म्हणाले की, कालची उद्धव ठाकरे यांची सभा याचं थोडक्यात विश्लेषण करायचं झाल्यास पाहिजे तर दोन हाणा, पण मला बाजीराव म्हणा, अशी उद्धव ठाकरे यांची अवस्था झाली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी किती वाकायचं याची परिसीमाच मुळी संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरे यांनी संपवली आहे, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला.
‘दोन हाना, पण मला बाजीराव म्हणा’ उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झालीय…
— Prasad Lad (@PrasadLadInd) August 17, 2024
मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी करायची? याची परिसीमाच, संजय राऊतच्या नादी लागून उद्धव ठाकरेंनी ओलांडली आहे!#Maharashtra@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@Dev_Fadnavis@cbawankulepic.twitter.com/mkdqHX8Jts
ते पुढे म्हणाले की, ज्या मातोश्रीला शिवसैनिक दैवत मानतात, ज्या मातोश्रीवर शिवसैनिक नतमस्तक होत होते. त्या मातोश्रीवर राहणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आज सोनिया गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्या पाया पडावं लागतंय, तसेच मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा, असं सारखं सारखं म्हणावं लागतंय. त्यामुळे वर जे मी म्हटलं की, पाहिजे तर दोन हाणा पण मला मुख्यमंत्री म्हणा, अशी उद्धव ठाकरे यांची अवस्था झालेली आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.