‘बेस्ट’मधील दोघा लाचखोरांना अटक

By admin | Published: June 28, 2016 04:12 AM2016-06-28T04:12:53+5:302016-06-28T04:12:53+5:30

थकीत वेतन परत मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ‘बेस्ट’च्या दोघा अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकड

Two bribe holders of 'Best' arrested | ‘बेस्ट’मधील दोघा लाचखोरांना अटक

‘बेस्ट’मधील दोघा लाचखोरांना अटक

Next


मुंबई : पंचिग कार्ड खराब असल्याने गैरहजरी लागलेल्या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन परत मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ‘बेस्ट’च्या दोघा अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. सहाय्यक अधीक्षक अनिल करगुटकर (वय ५७) व अधीक्षक अभियंता गणेश सावळे (वय ३६) अशी त्यांची नावे आहेत. दोघे प्रतीक्षानगरातील आणिक आगार बस डेपोमध्ये कार्यरत आहेत.
कार्यालयाच्या परिसरात लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांत काहीकाळ घबराहट निर्माण झाली. ‘बेस्ट’मध्ये
सफाई कामगार असलेल्या काहीजणांची कार्यालयातील पंचिंग कार्ड खराब असल्याने हजेरी लागली नव्हती. (प्रतिनिधी)

Web Title: Two bribe holders of 'Best' arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.