उस्मानाबादमध्ये दोन बसची समोरासमोर धडक, 5 जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2016 11:49 AM2016-12-23T11:49:01+5:302016-12-23T11:49:01+5:30

दोन बसच्या धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक जण गंभीर झाले आहेत

Two buses hit face to face in Osmanabad, 5 deaths | उस्मानाबादमध्ये दोन बसची समोरासमोर धडक, 5 जणांचा मृत्यू

उस्मानाबादमध्ये दोन बसची समोरासमोर धडक, 5 जणांचा मृत्यू

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

उस्मानाबाद, दि. 23 -  दोन बसच्या धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक जण गंभीर झाले आहेत. शुक्रवारी सकाळी सोलापूर- हैदराबाद मार्गावर उमरगा तालुक्यातील येणेगूरजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. जखमींमधील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. 
 
महाराष्ट्र परिवहन महामंडळाची उमरगा-पुणे आणि कर्नाटक परिवहन महामंडळाची बसव-कल्याण या दोन बसची समोरासमोर धडक झाली. मृतांमध्ये दोन्ही गाड्यांच्या चालकांचा समावेश आहे.  दरम्यान या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यास बराच काळ लागला होता.  

Web Title: Two buses hit face to face in Osmanabad, 5 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.