खामगावमध्ये जन्मले दोन तोंडाचे मूल!

By admin | Published: August 24, 2014 01:15 AM2014-08-24T01:15:19+5:302014-08-24T01:15:19+5:30

येथील सामान्य रुग्णालयात 35वर्षीय महिलेने 2 तोंडे, 4 डोळे, 2 ओठ अशा शारीरिक व्यंग असलेल्या बाळाला शुक्रवारी रात्री जन्म दिला.

Two-child birth in Khamgaon | खामगावमध्ये जन्मले दोन तोंडाचे मूल!

खामगावमध्ये जन्मले दोन तोंडाचे मूल!

Next
खामगाव (जि. बुलडाणा) : येथील सामान्य रुग्णालयात 35वर्षीय महिलेने 2 तोंडे, 4 डोळे, 2 ओठ अशा शारीरिक व्यंग असलेल्या बाळाला शुक्रवारी रात्री जन्म दिला. 
खामगाव येथील सामान्य रुग्णालयात शेगाव तालुक्यातील 35वर्षीय महिला प्रसूतीसाठी आली. रात्री 8 वाजेच्या सुमारास या महिलेने एका मुलाला जन्म दिला. त्याला चार डोळे, दोन तोंडे, दोन ओठ, दोन कान आहेत. बाळाची टाळू दुभंगलेली असून ओठही दुभंगलेले आहेत. जन्मताच बाळाचे वजन 3.2 किलोग्रॅम आहे. बाळाच्या तोंडाचा भाग वगळता मानेपासून खालील अवयव सामान्य माणसासारखे आहेत. दोन्ही हात, पोट, छाती, लिंग, पाय यामध्ये मात्र कसलाही दोष नाही. या महिलेची प्रसूती नॉर्मल झाली असून, आईची प्रकृती ठीक आहे. बाळाला नवजात शिशू अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून, डॉक्टर त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.  (प्रतिनिधी)
 
सोनोग्राफी न करणो भोवले
स्त्रीला गर्भधारणोपासून तर प्रसूतीर्पयत 3 ते 4 वेळा सोनाग्राफी करणो गरजेचे आहे. सोनोग्राफीमुळे बाळाची तब्येत त्याच्या हालचाली वगैरे आढळून आल्यानंतर बाळ कमजोर असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केला जातो. मात्र सदर महिलेने वेळीच सोनोग्राफी न केल्याने या बाळाविषयी पुरेशी माहिती मिळू शकली नाही.
 
..तर गर्भपात करता येतो
च्गर्भधारणोपासून सुरुवातीला 18 आठवडे पूर्ण झाल्यानंतर सोनोग्राफी करणो गरजेचे आहे. यावेळी सोनोग्राफी केल्यानंतर जन्मजात असलेल्या बाळामध्ये काही व्यंग आढळल्यास तसेच या व्यंगामुळे ते जिवंत राहत नसल्यास 2क् आठवडय़ार्पयत कायद्याने त्या मातेचा गर्भपात करता येतो़ त्यामुळे जन्मजात दोष निदानाकरिता सोनाग्राफी महत्त्वाची ठरते.
 
रुग्णालयात जन्माला आलेले दोन तोंडाचे बालक हे सध्या नवजात
शिशू अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. एक लाख बाळांमध्ये अशा प्रकारचे बाळ जन्माला येत असल्याची आरोग्य विभागाची माहिती आहे. बाळाच्या आईची प्रकृती मात्र ठीक आहे. 
- डॉ. सुरेश सिरसाट, 
वैद्यकीय अधीक्षक, सामान्य रुग्णालय खामगाव 
 

 

Web Title: Two-child birth in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.