भाऊसाहेबाच्या लॉकरमध्ये सापडले दोन कोटींचे सोने!

By admin | Published: May 11, 2016 04:02 AM2016-05-11T04:02:12+5:302016-05-11T04:02:12+5:30

राज्यभरात गाजलेल्या केबीसी घोटाळ्यातील प्रमुख संशयित भाऊसाहेब व आरती चव्हाण या दाम्पत्याच्या शहरातील दोन लॉकर्सची मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली़

Two crore rupees of gold found in Bhausaheb's locker! | भाऊसाहेबाच्या लॉकरमध्ये सापडले दोन कोटींचे सोने!

भाऊसाहेबाच्या लॉकरमध्ये सापडले दोन कोटींचे सोने!

Next

नाशिक : राज्यभरात गाजलेल्या केबीसी घोटाळ्यातील प्रमुख संशयित भाऊसाहेब व आरती चव्हाण या दाम्पत्याच्या शहरातील दोन लॉकर्सची मंगळवारी (दि़१०) आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली़ या लॉकरमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांची ६ किलो ८०० ग्रॅम सोन्याची नाणी सापडली असून, ती केबीसीत गुंतवणूक वाढविणाऱ्या एजंटांना देण्यासाठी तयार करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे़
रविवार पेठेतील जानकी अपार्टमेंटमधील नगर अर्बन को-आॅप. बँकेतील लॉकरची अधिकाऱ्यांनी तपासणी केली़ यानंतर मेरी येथील स्टेट बँक आॅफ इंडियामधील लॉकरची तपासणी केली. त्यावेळी हे घबाड मिळाले.
सद्यस्थितीत ही मालमत्ता बँकेच्या लॉकरमध्येच ठेवण्यात आली असून, केबीसी प्रकरणात शासनाने नियुक्त केलेले उपजिल्हाधिकारी यावर निर्णय घेणार आहेत़ भाऊसाहेब चव्हाण याच्या आणखी एक लॉकरची तपासणी बाकी असून ती बुधवारी (दि़११) केली जाणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Two crore rupees of gold found in Bhausaheb's locker!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.