पंढरपूरमध्ये मोबाईल दुकानाला आग लागुन दोन कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2016 10:13 AM2016-10-13T10:13:18+5:302016-10-13T10:41:07+5:30
पंढरपूरमधील मोबाईल शॉपला आग लागून १ कोटी ८० लाखांचे नुकसान झाले.
>ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. १३ - येथील गांधी मोबाईल शॉपी दुकानाला गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात कारणामुळे आग लागली. यामुळे दुकानातील १ कोटी ८० लाख रुपये किंमतीचे मोबाईल जळाले असल्याची माहिती मोहन गांधी यांनी दिली.
पंढरपूूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणचे दुकान असल्याने गांधी मोबाईल शॉपी दुकानात ग्राहकांची सतत गर्दी असते. त्याच बरोबर त्यांच्याकडे मोबाईलच्या विविध कंपन्यांची एजन्सी होती. तसेच दिवाळी उत्सव काहीच दिवसांवर आल्याने विविध कंपन्याचे हजारो मोबाईल रिटेल व होलसेल दराने विक्री करण्यासाठी गांधी यांनी दुकानात ठेवले होते. मात्र गुरुवारी पहाटे अचानक कोणत्यातरी अज्ञात कारणाने दुकानाला आग लागली. यामुळे दुकानातील सर्व फर्निचर, मोबाईल, कागदपत्रे, व अन्य साहित्य जळाले आहे. यामुळे गांधी मोबाईल शॉपीचे १ कोटी ८० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती दुकान मालक मोहन गांधी यांनी दिली.