रेल्वे प्रवाशांचा दोन कोटींचा विसराळूपणा

By admin | Published: January 5, 2017 04:15 AM2017-01-05T04:15:52+5:302017-01-05T04:15:52+5:30

रेल्वे प्रवासात बॅग आणि मौल्यवान वस्तू विसरल्याच्या किंवा गहाळ झाल्याच्या घटनांमध्ये गेल्या दोन वर्षांत मोठी वाढ झाली आहे

Two crores of passenger rail passes | रेल्वे प्रवाशांचा दोन कोटींचा विसराळूपणा

रेल्वे प्रवाशांचा दोन कोटींचा विसराळूपणा

Next

मुंबई : रेल्वे प्रवासात बॅग आणि मौल्यवान वस्तू विसरल्याच्या किंवा गहाळ झाल्याच्या घटनांमध्ये गेल्या दोन वर्षांत मोठी वाढ झाली आहे. त्याचा मनस्ताप प्रवाशांना होतानाच, लोहमार्ग पोलिसांनाही होतो. २0१६ मध्ये रेल्वे प्रवाशांच्या विसरभोळेपणामुळे तब्बल दोन कोटींपेक्षा अधिक बॅग आणि मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याचे समोर आले आहे. यात तब्बल ८0 लाख किमतीचे लॅपटॉप आणि २६
लाख रुपये किमतीच्या सोन्याचा समावेश आहे.
मदतीसाठी ९८३३३३११११ हा हेल्पलाइन क्रमांक आहे. या हेल्पलाइनवर बॅग विसरल्याच्या किंवा गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी किंवा मदतीसाठी कॉल येतात. २0१५ मध्ये ११ हजार ७0७ कॉल बॅग विसरल्याच्या आणि त्या गहाळ झाल्याचे आले होते. यामध्ये ५२ लाख रुपये किमतीचे १३५ लॅपटॉप आणि ६८४ ग्रॅमचे १३ लाख ३८ हजार किमतीच्या सोन्याचा समावेश होता. लोहमार्ग पोलिसांकडून त्याचा शोध घेऊन बॅग शोधून दिल्या जातात. २0१६ मध्येही याचे प्रमाण बघितल्यास ते वाढल्याचेच दिसते. बॅग विसरल्याच्या आणि गहाळ झाल्याचे १२ हजार ९२९ कॉल लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाइनवर आले. त्यापैकी २ हजार ७८३ बॅगच प्रवाशांना परत करण्यात आल्या. त्यामध्ये सर्वाधिक तब्बल ८0 लाख ४८ हजार रुपये किमतीचे २0६ लॅपटॉप, २६ लाख ६0 हजार ५८0 रुपये किमतीचे ९५३.६ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे, तर २0 लाख ८८ हजारांचे २0५ मोबाइलही असल्याची माहिती देण्यात आली. रोख रक्कम आणि अन्य साहित्य असे एकूण २ कोटी ८ लाख ९१ हजार ८३३
रुपयांचे साहित्य परत करण्यात
आले. (प्रतिनिधी)

रोख रक्कमही ताब्यात : रोख रक्कम असलेली बॅगही प्रवासी
रेल्वे प्रवासात विसरतात. अशी एकूण २0 लाख ७१ हजार १३0 रुपये रोख रक्कम, तर ६0 लाख २३ हजार ७८५ किमतीचे इतर साहित्य प्रवाशांना परत करण्यात आले. यात रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल ६९५ पोलिसांना गौरविण्यातही आले.

Web Title: Two crores of passenger rail passes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.