कार्यालय नूतनीकरणावर दोन कोटींचा खर्च
By admin | Published: August 9, 2015 02:48 AM2015-08-09T02:48:51+5:302015-08-09T02:48:51+5:30
मंत्री व राज्यमंत्री कार्यालयांच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधींची उधळण करीत असून, राज्यातील १५ मंत्र्यांच्या कार्यालय नूतनीकरणावर दोन कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे समोर आले आहे.
मुंबई : मंत्री व राज्यमंत्री कार्यालयांच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधींची उधळण करीत असून, राज्यातील १५ मंत्र्यांच्या कार्यालय नूतनीकरणावर दोन कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारान्वये प्राप्त झालेल्या कागदपत्रांतून ही बाब समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्याने शासनाकडे नव्या सरकारमधील मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या नूतनीकरणावर झालेल्या खर्चाची माहिती मागितली होती. सामान्य प्रशासनाने प्रथमत: यासंबंधीची माहिती दिली नाही. त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या अपील अर्जावर झालेल्या सुनावणीनंतर माहिती अधिकार कार्यकर्त्याला ही माहिती देण्यात आली. २८ पैकी ९ मंत्री आणि ६ राज्यमंत्र्यांनी कार्यालयाच्या नूतनीकरणावर दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये १ कोटी ७४ लाख ७४ हजार ४०१ रुपये स्थापत्य आणि २५ लाख १६ हजार ४३८ रुपये विद्युत कामावर खर्च करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी) कार्यालय नूतनीकरण खर्च रवींद्र वायकर : ३३,९९,१७० चंद्रकांत पाटील:३१,८८,६७ विष्णू सावरा :२०,४८,२७१ विनोद तावडे : २०,२४,७५५ रणजीत पाटील : १५,५३,४५० प्रकाश महेता : १४,२७,९०६ गिरीश महाजन : १३,४३,१२७ विद्या ठाकूर : ९,९८,३१४ संजय राठोड : ९,९६,३९६ एकनाथ शिंदे : ९,९२,७१४ राजकुमार बडोले : ४,८३,८६४ दिलीप कांबळे : ४,६७,८६४ गिरीश बापट : ४,४६,७९८ दीपक केसरकर: ४,00३३६ चंद्रशेखर बावनकुळे: २,१९,७५०