राज्यातील जिल्हा परिषदांच्या अभियंत्यांचे दोन दिवशीय सामुहीक रजा आंदोलन; ठाणे जि.प.च्या ८३ अभियंत्यांचा सहभाग
By सुरेश लोखंडे | Published: March 20, 2018 04:19 PM2018-03-20T16:19:01+5:302018-03-20T16:19:01+5:30
सामुहीक रजा घेऊन राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या राज्यस्तरीय आंदोलनाव्दारे अभियंत्यांनी केला. या आदोलनाची दखल न घेतल्यास अभियंत बेमुदत संपाचे रणशिंग फुंकण्याच्या प्रयत्नात आहे. राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांमधील बांधकाम, पाणी पुरवठा, लघू पाटबंधारे आदी विभागांती अभियंते या सामुहीक रजा आंदोलनास सहभागी आहेत.
ठाणे : विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील (जि.प.) सुमारे तीन हजार ५०० अभियंत्यांनी सोमवारपासून सामुहीक रजा आंदोलन छेडले. यात ठाणे जिल्हा परिषदेच्या सुमारे ८३ अभियंत्यांनी सहभाग घेतला. आंदोलनाच्या आजच्या दिवशी देखील अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आदोलन सुरू ठेवून घोषणाबाजी सुरू ठेवली आहे.
सामुहीक रजा घेऊन राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या राज्यस्तरीय आंदोलनाव्दारे अभियंत्यांनी केला. या आदोलनाची दखल न घेतल्यास अभियंते बेमुदत संपाचे रणशिंग फुंकण्याच्या प्रयत्नात आहे. राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांमधील बांधकाम, पाणी पुरवठा, लघू पाटबंधारे आदी विभागांती अभियंते या सामुहीक रजा आंदोलनास सहभागी आहेत. ठाणे जि.प.च्या अभियंत्यांचे नेतृत्व जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मोहन पवार यांच्यासह जिल्हा शाखेचे अध्यक्ष अभियंते डी.ए.गीते, सचिव अरूण बडगुजर, विभागीय उपाध्यक्ष प्रशांत खैरनार आदींच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुमारे ८३ अभियंते यात सहभागी झाले.
विविध मागण्यांसाठी अभियंत्यांनी दोन दिवशीय सामुहीक रजा आंदोलन सुरू केले आहेत. परंतु त्यांच्या विभागांमधील अन्य कर्मचारी वर्ग कार्यालयात कार्यरत असल्याचे प्रतिपाद ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील यांनी केले.
२४ वर्षांच्या सेवेनंतरची हक्काची पदोन्नती या प्रमुख मागणीसह अतांत्रिक कामांना विरोध आदी मांगण्यासाठी अभियंत्यांनी प्रथम हे दोन दिवशीय रजा आंदोलन छेडले आहे. सदनशीर मार्गाने सुरू केलेल्या आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा अभियंत्यांकडून देण्यात आला. ऐन उन्हाळ्यात अभियंत्यांनी आंदोलन हाती घेतले. या आंदोलनाच्या कालावधीत सर्वाधिक परिणाम पाणी पुरवठा विभागाच्या अत्यावश्यक सेवेवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.