विधिमंडळाचे उद्यापासून दोन दिवसीय अधिवेशन; भाजपकडे सरकारला घेरण्याची संधी कमीच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 03:33 AM2020-12-13T03:33:35+5:302020-12-13T06:57:23+5:30

प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे सरकारला घेरण्याची संधी कमीच असेल. त्याच वेळी विधान परिषद निवडणुकीच्या विजयाने आत्मविश्वास वाढलेले सरकार अधिवेशनाची औपचारिकता पूर्ण करेल.

two day session of the legislature will begin from tomorrow | विधिमंडळाचे उद्यापासून दोन दिवसीय अधिवेशन; भाजपकडे सरकारला घेरण्याची संधी कमीच

विधिमंडळाचे उद्यापासून दोन दिवसीय अधिवेशन; भाजपकडे सरकारला घेरण्याची संधी कमीच

Next

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनास सोमवारपासून (१४ डिसेंबर) मुंबईत सुरुवात होत आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे सरकारला घेरण्याची संधी कमीच असेल. त्याच वेळी विधान परिषद निवडणुकीच्या विजयाने आत्मविश्वास वाढलेले सरकार अधिवेशनाची औपचारिकता पूर्ण करेल.

पुरवणी मागण्या मांडून आणि दिवंगत आजी-माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहून पहिल्या दिवसाचे कामकाज संपेल. त्यामुळे अधिवेशनाला केवळ एकच दिवस मिळणार आहे. कोरोनाची परिस्थिती राज्यात परिस्थिती आटोक्यात आली आहे, ही सरकारसाठी जमेची बाजू असेल. महाविकास आघाडी सरकारला अलीकडेच एक वर्षे पूर्ण झाले. तिन्ही पक्षांमध्ये एकी असल्याचे विधान परिषद निवडणूक निकालातून दिसले. अधिवेशनातही तसेच चित्र बघायला मिळेल, असे दिसते.

विधिमंडळ अधिवेशनालाही कोरोनाचा फटका बसला आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार नुकताच सुरू झाला होता, तेव्हा अर्थसंकल्‍पीय अधिवेशन सुरू होते. ते गुंडाळावे लागले होते. पावसाळी अधिवेशनही लांबले व ते सप्टेंबरमध्ये घेण्यात आले. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची प्रथा आहे. मात्र, कोरोनाचे सावट लक्षात घेता, मुंबईतच हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय कामकाज सल्‍लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हे अधिवेशनही ७ डिसेंबरला घेण्यात येणार होते. मात्र, आता १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. महिला, बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात शक्ती कायद्याचे विधेयक या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
 

Web Title: two day session of the legislature will begin from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.