खामकरला दोन दिवसांची कोठडी
By admin | Published: August 6, 2014 01:40 AM2014-08-06T01:40:52+5:302014-08-06T01:40:52+5:30
नायब तहसीलदार सुहास खामकर व गणोश खोगाडे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Next
अलिबाग : पन्नास हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पनवेल येथे अटक केलेला शरीरसौष्ठव स्पर्धेतील मिस्टर इंडिया व पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकर व त्याच्या कार्यालयातील लिपिक गणोश खोगाडे यांना मंगळवारी येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता या दोघांनाही दोन दिवस (7 ऑगस्टर्पयत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायाधीश एच.ए. पाटील यांनी दिले आहेत.
नायब तहसीलदार सुहास खामकर याने लिपिक गणोश खोगाडे याच्या माध्यमातून लाच घेतली आहे. यासंदर्भातील मोबाइलवरील संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका:यांनी ध्वनिमुद्रित केले आहे. आवाजाची खातरजमा व अन्य तपासासाठी खामकर व खोगाडे या दोघांनाही किमान आठ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी न्यायालयाकडे केली.
दरम्यान, लाचेची रक्कम थेट नायब तहसीलदार सुहास खामकर यांनी स्वीकारलेली नाही. त्याचबरोबर सातबा:यावर नावाच्या नोंदी करण्याचे काम नायब तहसीलदार यांचे नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या सापळ्यात नायब तहसीलदार सुहास खामकर यांना गोवण्याचे हे कारस्थान आहे. तपासाच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही तपास अधिका:यांनी पूर्ण केलेली असताना आता खामकर यांना पोलीस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन नायब तहसीलदार सुहास खामकर यांचे वकील अॅड. प्रवीण ठाकूर यांनी न्यायालयात केले.
उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायालयाने दोघाही आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, आज दुपारपासूनच पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकर याच्या सहकारी शरीरसौष्ठवपटूंनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. तर सरकारी यंत्रणोतदेखील आजच्या या सुनावणीबाबत मोठी औत्सुक्य होते. (विशेष प्रतिनिधी )