फक्त कोरोनायोद्धा म्हणू नका मागण्याही मान्य करा, परिचारिकांचं दोन दिवस कामबंद आंदोलन!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 11:04 AM2021-06-23T11:04:26+5:302021-06-23T11:05:01+5:30

शासनलेखी फक्त कागदोपत्री कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा असं म्हणज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या दिवसभर कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

two days strike of nurses in maharashtra for various demands | फक्त कोरोनायोद्धा म्हणू नका मागण्याही मान्य करा, परिचारिकांचं दोन दिवस कामबंद आंदोलन!

फक्त कोरोनायोद्धा म्हणू नका मागण्याही मान्य करा, परिचारिकांचं दोन दिवस कामबंद आंदोलन!

Next

शासनलेखी फक्त कागदोपत्री कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा असं म्हणज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या दिवसभर कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील परिचारिकांनी दिला आहे. ऐन कोरोना महामारीच्या काळात परिचारिकांनी पुकारलेल्या संपामुळे रुग्णांचे हाल होण्याची दाट शक्यता आहे. 

गेले दोन दिवस परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी सकाळी दोन तास काम बंद आंदोलन केलं होतं. पण त्यानंतरही राज्य सरकारकडून दखल न घेतली गेल्यानं परिचारिकांनी आता आक्रमक पवित्रा घेत दोन दिवसीय कामबंद आंदोलन पुकारलं आहे. 

आरोग्य विभागात परिचारिकांच्या कायमस्वरुपी पदभरती करा, केंद्राप्रमाणे जोखमी भत्ता, कोविड काळात ७ दिवस कर्तव्यकाळ आणि तीन दिवस अलगीकरण रजा कायम ठेवावी, कोरोना काळात बंद करण्यात आलेली साप्ताहिक रजा पुन्हा सुरू करावी अशा काही प्रमुख मागण्यांसह परिचारिकांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. 

मुंबईतील जे जे रुग्णालयात आंदोलन
मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील ३७५ परिचारिकांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. याशिवाय सेंट जॉर्ज रुग्णालयातील १७५ आणि जीटी रुग्णालयातील १०० परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयात आज गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. आंदोलनानंतर देखील मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बेमुदत संपाचा इशारा देखील परिचारिकांनी दिला आहे. 

Read in English

Web Title: two days strike of nurses in maharashtra for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.