उद्यापासून दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 08:55 PM2018-03-14T20:55:06+5:302018-03-14T20:55:06+5:30
दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे उद्या दि. 15 व 16 मार्च रोजी राज्यातील कोकण विभाग...
मुंबई : दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे उद्या दि. 15 व 16 मार्च रोजी राज्यातील कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आणि तापमानात घट होणार असून या दोन दिवसात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या काळात गारपीट अथवा वादळाची शक्यता नाहीये पण तरीही शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी व कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे. या काळात बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींमुळे गहू आणि आंबा मोहोर यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी आवश्यक त्या उपाययोजना करुन शेतमालाचे नुकसान टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.