दोन वेगवेगळी पदे, परीक्षा मात्र एकच! अर्ज आणि फी घेतली मात्र दोनची...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 07:06 AM2024-03-01T07:06:17+5:302024-03-01T07:06:29+5:30
एमपीएससीने समाज कल्याण अधिकारी - गट ब पदासाठी १० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती तर, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी- गट ब पदासाठी ५ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.
- दीपक भातुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) दोन वेगवेगळ्या पदांच्या भरतीसाठी दोन वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या, वेगळे अर्ज भरून घेतले, वेगवेगळी फी भरून घेतली. मात्र, या दोन पदांसाठी परीक्षा एकच घेतली जाणार आहे. एमपीएससीने घातलेल्या या घोळाबद्दल स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
एमपीएससीने समाज कल्याण अधिकारी - गट ब पदासाठी १० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती तर, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी- गट ब पदासाठी ५ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, या दोन्ही पदांसाठी संयुक्त चाळणी परीक्षा रविवार १९ मे, २०२४ रोजी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, पुणे व नवी मुंबई या जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
अर्ज वेगळे, फी वेगळी मग परीक्षा एकच का?
nदोन्ही पदांसाठी एकच परीक्षा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. दोन्ही पदांसाठी वेगवेगळे अर्ज भरून दोनदा फी भरली होती.
nजर अर्ज वेगळे घेतले, फी दोन्ही अर्जांसाठी घेतली तर मग परीक्षा वेगवेगळी का घेतली जात नाही, असा सवाल हे विद्यार्थी करत आहेत.