उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवणार दोन माजी अधिकारी; निवडणूक आयोगाकडून नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 09:56 PM2019-09-23T21:56:24+5:302019-09-23T21:57:09+5:30
निवडणूक आयोगाने माजी महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने दोन विशेष पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असून हो दोन्ही अधिकारी निवडणूक खर्चावर लक्ष ठेवणार आहेत.
निवडणूक आयोगाने माजी महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे. मधू महाजन (माजी आयआरएस 1982) आणि बी मुरली कुमार (माजी आयआरएस 1983) हे उमेदवार आणि पक्षांच्या खर्चावर लक्ष ठेवणार आहेत.
महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरला निकाल घोषित केला जाणार आहे. याबाबतची आचारसंहिता 27 सप्टेंबरला लागू झाली असून 4 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारिख आहे. तर अर्ज माघारी घेण्याची तारिख 10 ऑक्टोबर असणार आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 28 लाख रुपये ठेवली असून अन्य राज्यांमध्ये 64 जागांवर पोटनिवडणुका घेतल्या जाणार आहेत.